रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन को-ऑपरेटिव्ह बँकावर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. या तीन बँकापैकी दोन बँका या महाराष्ट्रातील आहेत तर एक बँक ही पश्चिम बंगाल मधील आहे. या आधी रिझर्व्ह बँकेने मार्चमध्ये सुद्धा आठ बँकांना नियम मोडल्याप्रकरणी दंड सुनावला होता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहिर केलेल्या परिपत्रकात सांगितले आहे की, महाराष्ट्रातील फलटणमध्ये स्थित यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुंबईमध्ये स्थित कोंकण मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक यांना अनुक्रमे दोन लाख रुपयांचा दंड लावला आहे. तर कोलकात्यातील समता को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड लावला आहे.
मार्च महिन्यात आठ बँकांवर लावला होता दंड
भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India – RBI) ने १४ मार्च २०२२ रोजी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपुर, गुजरात, हिमाचल आणि उत्तर प्रदेशमधील आठ सहकारी बँकावर १२ लाख रुपये व अधिकचा दंड लावला होता. रिझर्व्ह बँकेने नियम आणि निर्देशांचे पालन न करण्यासाठी हा दंड लावला होता.
भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यावेळेस मणिपुर महिला सहकारी बँक लिमिटेड (मणिपुर), युनाइटेड इंडिया सहकारी बँक लिमिटेड (उत्तर प्रदेश), जिल्हा सहकारी केंद्रीय बँक (नरसिंहपुर), अमरावती मर्चेंट सहकारी बँक लिमिटेड (अमरावती), फैज मर्केंटाइल सहकारी बँक लिमिटेड (नाशिक) आणि नवनिर्माण सहकारी बँक लिमिटेड (अहमदाबाद) या बँकावर निर्बंध लावले होते.
याआधी आरबीआयने चीनी कंपन्यांसोबत डाटा शेयरिंगच्या मुद्द्यावर फिनटेक फर्म पेटीएम (Paytm) वर कारवाई केली होती. ११ मार्चला दिलेल्या आदेशानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकला (Paytm Payments Bank) नवीन कस्टमर्स जोडण्यापासून अवरोध केला होता.