Home क्राईम RFO दिपाली चव्हाणच्या सुसाईड नोटमध्ये नवनीत राणा यांचा उल्लेख

RFO दिपाली चव्हाणच्या सुसाईड नोटमध्ये नवनीत राणा यांचा उल्लेख

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट रेंजमधील RFO यांनी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी दिपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

3019
0
dipali chavan suicide letter
RFO दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये खासदार नवनीत राणा यांचा उल्लेख आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर दिपालीने लिहिलेली चार पानांची सुसाईड नोट प्राप्त झाली असून त्यात दिपालीने खळबळजनक आरोप केले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO आणि दिपालीचे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. तसेच या पत्रात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे देखील नाव घेण्यात आले आहे. या पत्रानंतर आता शिवकुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विनोद शिवकुमार यांच्या छळाबद्दलची माहिती खासदार नवनीत राणा यांना दिली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दिपाली यांच्यावर अॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी शिवकुमार यांनी फोनवर दिली होती. या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग नवनीत राणा यांना ऐकवल्याचे दिपाली यांनी म्हटले आहे. मात्र तरिही काही दिलासा मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत RFO दिपाली चव्हाण या २८ वर्षीय तरूण महिला अधिकारीने शासकीय निवास स्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली हे सदर पत्रातुन दिसून येत आहे.

मुळची साताराची हुशार तरूणी दिपाली चव्हाण लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण होऊन RFO पदी नियुक्ति मिळते. पहिलीच पोस्टिंग मेळघाटमध्ये ती पण अतिदुर्गम मागासलेल्या भागात. जिथे माणस कामे करायला घाबरतात तिथे ही तरूण मुलगी आपली कर्तव्याची अमिट छाप उमटवली होती.

Previous articleप्रियांकाचा बोल्ड अंदाज आणि तिची अनोखी स्टाईल
Next articleकोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर सरकारने नवी नियमावली केली जाहीर..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here