कोल्हापूर जिल्ह्यात एका पोलिस निरीक्षकाने आपल्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अनेक दिवस होणाऱ्या त्रासातून मोकळे होण्यासाठी पोलीस निरीक्षण प्रदीप काळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्या खावून वारणा नदीपात्रात उडी मारली. मात्र सुदैवाने त्यांना वाचविण्यात आले आहे.
काळे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटस वर एक मजकूर पोस्ट केला. ज्यात त्यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे असा उल्लेख करण्यात आला होता. त्यांच्या या प्रयत्नाने कोल्हापूर पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. सध्या प्रदीप काळे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळाली आहे.
पोलिस खात्यात फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनीही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. डिसेंबर २०२०मध्ये अशाच प्रकारची एक घटना तुळींज पोलीस ठाण्यात घडली होती. तेथील कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या के होत. अशा अनेक घटना घडलेल्या असून यावर ठोस कारवाई होण्याची नितांत गरज आहे.