
भडकावू भाषणं करणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकून राज्यातील विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. अनेक प्रयत्नानंतर विकास फाटक याला मुंबई सेशन्स कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर केला आहे.
समाजमाध्यमांवर अनेक गोष्टींना प्रधान्य दिलं जातं. यात चांगल्या गोष्टीप्रमाणे समाजात अशांतता पसरविणाऱ्या गोष्टीही वाऱ्याच्या वेगाने प्रसिद्ध होतात. काही दिवसांपूर्वी अशाच एका व्हिडिओमुळे मुंबईसह राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये अशांतता परसविण्याचे काम झाले. हिंदुस्थानी भाऊ म्हणून युट्युबर आपली प्रसिद्धी मिळवलेल्या विकास फाटक याने विद्यार्थ्यांच्या परिक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी केली. याला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील निवासास्थानासह राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनाचा पावित्रा घेतला. या हिंसक वळणाला हिंदुस्थानी भाऊ जबाबदार असल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.
अटक झाल्यानंतर आपण केलेल्या कृत्यातून बचाव होण्यासाठी जामीनाचा प्रयत्न हिंदुस्थानी भाऊकडून करण्यात येत होता. अखेरीस आज हिंदुस्थानी भाऊला मुंबई सेशन्स कोर्टाकडून पहिली फुरसत मध्ये घरी जाण्याची संधी मिळाली आहे. कोर्टाने विकास फाटकचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या सशर्त जामीनानुसार हिंदुस्थानी भाऊला ३० हजार रुपयांची वैयक्तीक हमी आणि तितक्याच रकमेसह एक किंवा दोन हमीदार देण्याची अट कोर्टाने घालून दिली आहे. त्यानंतरच जामीनाला मंजूर देण्यात येईल.