Home क्राईम तो हवालदार होऊ शकला नाही, मग तोतया IPS बनून त्याने लोकांना लुटलं

तो हवालदार होऊ शकला नाही, मग तोतया IPS बनून त्याने लोकांना लुटलं

435
0
Fake ips officer
तोतया आयपीएस अधिकारी फुसाराम

आपलं स्वप्न पुर्ण झालं नाही तर काही लोक पेटून उठतात आणि पुन्हा जोमाने स्वप्नांचा पाठलाग करतात. तर काही लोक नेमकं त्याच्या उलट वागतात. मेहनतीचा मार्ग सोडून सोपा मार्ग निवडतात. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडलीये. पाली जिल्ह्यात एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. केवळ दहावी शिकलेला एक तरुण आयपीएस असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करायचा. आयपीएस अधिकाऱ्याचा गणवेश, त्यावर बॅचेस, अशोक स्तंभ, स्टार अशा फुल गेटअपमध्ये या तोतयाला अटक करण्यात आलीये. सोबतच खोटे आडी कार्ड, बनावट एअरगन आणि वॉकीटॉकी देखील जप्त करण्यात आली.

पोलिसांनी जेव्हा या तरुणाची कसून चौकशी केली, तेव्हा कळले की हा तरुण २०१५ साली पोलीस शिपाईच्या परिक्षेला बसला होता. मात्र त्याला परिक्षेत यश मिळाले नाही. तेव्हापासून तो थेट तोतया आयपीएस अधिकारी बनून लोकांना लुटू लागला, अशी बातमी आज तक या संकेतस्थळाने दिली आहे.

गुरुवारी रात्री पाली जिल्ह्याच्या बस स्टँडवर मुंबईपर्यंत फुकट प्रवास करण्यासाठी हा तोतया पोलीस ट्रॅवल एजंटवर दबाव टाकत होता. ट्रॅवल एजंटने त्याच्या धमक्यांना तर भिक घातली नाहीच, उलट पोलिसांना बोलावून त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याचे फुसाराम नाव असल्याचे समोर आले. त्याचे आयडी कार्ड तपासले असता त्यावर राजवीर शर्मा असे लिहिले होते. फुसाराम हा पालीमधल्या सर्वोदय नगर येथे राहतो.

फुसारामची जेव्हा पोलिसांनी अधिक चौकशी केली तेव्हा तो चार वर्षांपासून लोकांना फूस लावत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात सादर केले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी त्याच्याकडे असलेला बनावट गणवेश आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं.

विशेष म्हणजे चार वर्षांपुर्वी एका तरुणीला आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून फसविल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र तेव्हा गणवेश वैगरे नसल्यामुळे पोलिसांनी त्याला फक्त धमकावून सोडून दिले होते. त्यानंतर हिंमत वाढलेल्या फुसारामने फुल गेटअप करुन लोकांना लुटायची कामं सुरु केली होती.

Previous articleपहिली ते आठवीच्या परिक्षा रद्द, शिक्षण मंत्री यांची मोठी घोषणा
Next article”ते ट्विट वाचल्यानंतर माझे हात थरथरत होते…” कंगानाच्या त्या ट्विटवर सान्याची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here