परीक्षा म्हटलं की, यात अनेक ठिकाणी उलाढाल करून विद्यार्थी पास होण्याचे पर्याय शोधत असतात. अशाच एका घबाड घोटाळ्याचा सेटलमेंट बादशाह राज तेवतिया याला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करून त्यांना पास करण्याची हमी देण्यात यायची. हे जाळे संपूर्ण देशभर पसरले असून याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील माहीम भागातून अरशद, सलमान आणि हेमंत या तीन डिलर्सना पोलिसांनी अटक केली आहे.
या रॅकेटचे पूर्ण कामाचे तीन विभाग केले होते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांकडून टोकन अमाऊंट घेतली जाते. दुसऱ्या टप्प्यात राज तेवतिया याच्या माध्यमातून परीक्षेच्या सिस्टीमध्ये एका विशेष सॉफ्टवेअर डाऊनलोड केले जाते यानंतर परीक्षेला विद्यार्थ्यांनी केवळ कॉम्प्युटर चालू करून बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा सुरु झाल्यावर त्या परीक्षेत उत्तर देण्याची पुढची सर्व प्रोसेस ही स्कॅालर टीमच्या माध्यमातून केली जायची. हे सॉफ्टवेअर परीक्षा सेंटरच्या सिस्टीमला चुकवण्यात यशस्वी होत.
प्राथमिक माहीतीनुसार जीमेटमधील १८ विद्यार्थ्यांच्या एका बॅचला माध्यमातून परीक्षेत पास करून देण्यात आले आहे. इतकेच नाही तर राजने दिलेल्या माहीतीनुसार या घोटाळ्यामध्ये वेगवेळ्या परीक्षा देण्यासाठी अनेक सॉल्वर उपलब्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची असलेल्या मागणीनुसार त्यांना गुण मिळवून दिले जायचे. यातूनच बक्कळ रक्कम मिळवण्याचा धंदा सुरु होता.
यामध्ये अटक केलेले आरोपींचे नेमके टॅलेंट किती ते पहा…
राज तेवतिया – बीए प्रथन वर्ष, संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाईंड.
हेमंत शाह – बीकॉम पास या घोटाळ्यामधील डिलर.
कुणाल गोयल – बीए पास, दिल्लीत कॉम्प्युटर ट्रेनिंगचा मालक.
मोहीत शर्मा – बीटेक पास, सॉल्वर म्हणून घोटाळ्यात सामील.
अरशद धुन्ना – बीकॉम पास, सिस्को या कॉम्प्युटर ट्रेनिंगचा मालक.
सलमान धुन्ना – बीटेक पास