Home क्राईम लॉकडाऊनमध्ये राज कुंद्राच्या अश्लिल उद्योगाची झाली भरभराट; दिवसाला कमवायचा लाखो रुपये

लॉकडाऊनमध्ये राज कुंद्राच्या अश्लिल उद्योगाची झाली भरभराट; दिवसाला कमवायचा लाखो रुपये

374
0
raj kundra adult film racket
प्रातिनिधिक छायाचित्र

सध्या राज कुंद्रा आणि त्याचा चित्रपटांचा (अश्लिल) उद्योग चांगलाच चर्चेत आहे. काहींनी दावा केलाय की त्या पॉर्न फिल्म्स होत्या. तर कुंद्रा आणि कंपनीचे म्हणणे आहे की, त्या फक्त Erotica (अश्लील) चित्रपट होते. अनेक लोक कुंद्राच्या अटकेनंतर या प्रकरणाचे गॉसिप करुन मजा घेतायत. पण तुम्हाला माहितीये का, राज कुंद्राने लॉकडाऊनच्या १८ महिन्यांच्या काळात हा अश्लिल उद्योग उभारून दिवसाला सहा ते आठ लाख रुपयांची कमाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त मिलिंद भारांबे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी सांगितले की, १८ महिन्यांपूर्वी राज कुंद्राने या व्यवसायाची सुरुवात केली आणि लॉकडाऊनच्या काळात हा व्यवसाय भरभराटीला आला.

अश्लिल चित्रपटांसाठी स्ट्रगलर मॉडेल मुलींना हेरले जायचे. वेबसीरीजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्यांना शुटिंगस्थळी बोलवले जायचे. त्यानंतर ऐनवेळी स्क्रिप्टमध्ये बदल झाल्याचे सांगून न्यूड सीन द्यायला सांगितलं जायचं. ज्या मुली असे सीन करण्यास नकार द्यायच्या, त्यांना शुटिंगसाठी झालेला खर्च भरून देण्याची बळजबरी केली जायची.

याचवर्षी मुंबईतील मढ येथील एका बंगल्यात अश्लिल चित्रपटाचे शुटिंग सुरु असल्याची माहिती मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाला लागली होती. पोलिसांनी जेव्हा या भाड्याच्या बंगल्यावर छापा टाकला, तेव्हा न्यूड व्हिडिओ शुटिंग सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
फेब्रुवारी २०२१ मध्ये पहिल्यांदा हे प्रकरण उजेडात आले होते. कुंद्राचा सहकारी उमेश कामत याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा व्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. हॉटशॉट ॲपवर भारतातून व्हिडिओ अपलोड केले जाऊ शकत नव्हते. त्यामुळे इकडे शुटिंग करुन एडिट केलेले व्हिडिओ युकेच्या कंपनीला WeTransfer साईटद्वारे पाठवले जायचे. तिथून मग हे व्हिडिओ ॲपवर अपलोड केले जात असत.

असे कमवले पैसे

हॉटशॉट या ॲपवर पेड सबस्क्राइबर्स कडून होणारी कमाई ॲप मेटेंनन्सच्या नावाखाली वर्ग केली जायची. मेटेंनन्ससाठी विआन नावाच्या युके बेस्ड कंपनीसोबत करार केला होता. विआन कंपनीच्या १३ बँक अकाउंट्सवर मेटेंनन्सच्या नावाखाली पैसे वळते केले जायचे. नंतर हे पैसे काही कंपन्यांच्या नावावर टाकल्यानंतर पुन्हा राज कुंद्राच्या अकाऊंटवर पाठविण्यात यायचे.

२३ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला न्यायालयात हजर केल्यानंतर आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पाच दिवसांसाठी त्यात वाढ दिली असून पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे.

Previous articleपावसाळ्यात गाडी सुरू करण्याआधी करा बॉनेट चेक
Next articleपूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ७०० कोटींच्या मदतीमागचे सत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here