Home क्राईम टिकटॉक स्टार समीर गायकवाडने घेतला आपल्या जीवनातून Exit

टिकटॉक स्टार समीर गायकवाडने घेतला आपल्या जीवनातून Exit

पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाडने आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्याच्या या निर्णयाचा धक्का त्याच्या चाहत्यांना बसला आहे. लोकांना चांगला विचार देऊन समीरने आपल्या जीवनाला पूर्णविराम का दिला याची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली करण्यात आली आहे.

393
0

पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे समीरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे (Tik Tok Star Samir Gaikwad). रविवारी सायंकाळी पाच वाजता २२ वर्षीय समीरने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली(Samir Gaikwad Suicide). आजकाल समाजमाध्यमांमधून अनेकांना लोकप्रियता मिळते आहे. यातीलच टिकटॉक हे माध्यम बनलं आहे. यातून लोकप्रियता मिळाल्यांपैकी समीरही एक होता. समीरने त्याच्या व्हिडीओमधून अनेकांची मनं जिंकली होती. त्यामुळे, त्याने घेतलेल्या अशा चुकीच्या निर्णयाचा धक्का त्याच्या चाहत्यांना बसला आहे. अशातच आता समीरचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे.

समीरनं रविवारी इन्स्टाग्रामवरील त्याच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र त्याचा हा व्हिडीओ शेवटचा ठरेल हे कोणालाही वाटलं नसावे. या व्हिडीओमध्ये समीरने सकारात्मक विचार त्याच्या चाहत्यांपुढे मांडले आहेत.एकमेकांना मागे न खेचता लोकांना सहकार्य करून पुढं कसं जावे, याविषयीचा हा व्हिडीओ समीरने बनवला आहे. अशी सकारात्मक पोस्ट शेअर करून समीरने चुकीचा निर्णय का घेतला, असा सवाल त्याचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करुन विचारत आहेत.

समीरच्या आत्महत्येची घटना जेव्हा त्याच्या मोठ्या भावाला कळाली. तेव्हा त्याने याची माहीती तात्काळ स्थानिक पोलिसांना दिली. समीरने घेतलेल्या निर्णयावर घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याने आत्महत्येचे नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. समीर गायकवाड हा पुण्यातील वाडीया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. पोलिसांनी केलेल्या तपासातून टिकटॉक स्टार समीरने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेची अधिकृत माहीती अजूनही समोर आलेली नाही. मात्र याची सखोल चौकशी स्थानिक पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

Next articleकाय सांगता! कोरोनातून वाचलेले रुग्ण पुन्हा होऊ शकतात कोरोनाबाधित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here