असं म्हणतात की आपल्या सारखेच दिसणारे या जगात एकूण सात माणसं असतात. अर्थात प्रत्येकाला शोधणं कठीणच आहे म्हणा… पण ५ भारतीय क्रिकेटर्स असे आहेत ज्यांचे अगदी त्यांच्यासारखेच दिसणारे जुळे इसम जगासमोर आले आहेत. आणि गंमतीची गोष्ट अशी की, ते सुद्धा क्रिडा क्षेत्राशी निगडीत आहे. या पाच पैकी एक इसम हा रेसलिंग क्षेत्रातील आहे तर उर्वरित चार जण क्रिकेटर्स आहेत.
१) हार्दिक पंड्या आणि कार्मेलो हायेस
After making a successful career in Cricket. Hardik pandya debuts in NXT pic.twitter.com/j4eDX0RZZZ
— Ansh Saxena (@iam_kakarot69) February 22, 2022
हार्दिक पंड्या हा एक भारतीय अष्टपैलू क्रिकेटर्स आहेत. आगामी नव्या आयपीएलच्या मोसमात नवख्या गुजरात टायटंस या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहेत. वर नमूद ट्विट गेल्याच आठवड्यात खूप ट्रेंण्ड होत होतं. कार्मेलो हायेस हा एक डब्ल्यू डब्ल्यू ई सुपरस्टार असून तो जवळपास काय… पूर्णत:च हार्दिक पंड्या दिसतो आहे.
२) कुलदीप यादव आणि बिनुरा फर्नांडो
कुलदीप यादव हा एक भारतीय स्पिनर असून सध्या तो भारतीय संघात खराब फॉर्ममुळे आतबाहेर करत आहे. तर त्याच्यासारखाच बिनुरा फर्नांडो हा एक श्रीलंकन क्रिकेटर असून नुकतंच श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या टी-२० मालिकेदरम्यान त्याला प्रेक्षकांनी टिपलं होतं.
३) प्रसिद्ध कृष्णा आणि दसून शनाका
आपला प्रसिद्ध कृष्णा आणि श्रीलंकेचाच दसून शनाका हे देखील जवळपास सारखेच दिसतात. गेल्या वर्षी झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान झालेल्या क्रिकेट मालिकेत प्रेक्षकांनी त्यांना टिपलं होतं.
४) विराट कोहली आणि सौद शकील
#Pakistan New Batsman Saud Shakeel Looks like Indian Skipper #ViratKohli : pic.twitter.com/8fhYpeLSUg
— The National Bulletin (@TheNationalBul1) July 14, 2021
पाकिस्तानचा उद्योन्मुख सौद शकीलचा फोटो गेल्या वर्षी बराच व्हायरल झाला होता. ज्याची चेहरेपट्टी जवळपास विराट कोहली सारखी आहे. तुम्ही जर दोघांचेही फोटो बाजूबाजूला ठेवून निरखून पाहिलत तर दोघेही तुम्हाला सारखेच दिसतील.
५) अजिंक्य रहाणे आणि धवल कुलकर्णी
Dhawal Kulkarni and Ajinkya Rahane without an iota of doubt. https://t.co/FeZ1cAv8uK pic.twitter.com/W2OiCeteMt
— Jaanvi🏏 (@ThatCric8Girl) September 3, 2021