कोरोनाच्या अगोदर सोनू सूद एक अभिनेता म्हणून सर्वांना परिचित होता. मात्र, कोरोनाकाळात सोनू सूदमधील माणूसकीचे दर्शन संपूर्ण देशाला झाले. त्याने गरजूंना आणि मजूरांना केलेल्या मदतीचं कौतुक साऱ्या देशभरातून झालं. लॉकडाऊनच्या वाईट काळात अभिनेता सोनू सूद लोकांच्या मदतीला धावून गेला. ज्यांनी त्याच्याकडे मदत मागितली अशा प्रत्येक व्यक्तीला त्याने मदत देखील केली. कोणी त्याच्याकडे वैद्यकीय उपचारासाठी मदत मागितली तर काहीजणांनी लॉकडाऊनच्या काळात गावी जाण्यासाठी प्रवासी बस मागितली. तळागाळातील लोकांना विविध प्रकारची मदत करुन त्याने लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. दक्षिणेतल्या लोकांनी तर सोनू सूदला देवाचा दर्जा देऊन त्याच्या कटआऊट्स ला दुग्धाभिषेक केला.
अपघातानंतर सोनू सूद मदतीला धावून गेला
सोनू सूदने अनेक लोकांना मदत केली आहे. अनेक लोकांनी तर त्याला देवासमान मानतात. सोनूकडे कोणीही मदत मागितली तर तो कोणालाही निराश न करता सरळ हाताने मदत करतो. नुकताच सोनू सूदने पंजाबमधील एका युवकाचे प्राण वाचवले आहेत. त्याचे झाले असे की, सोनू सूद पंजाबमधील मोगा या जिल्ह्यातील कोटकपुरा बायपासने जात होता. त्याचवेळी रस्त्यावर एक अपघात झाला होता. कुठल्याही विचार न करता सोनू सूद अपघात झालेल्या ठिकाणी गेल्या आणि अपघातामधील जखमींना मदत करण्यासाठी पुढे आला.
सोनू सूदने अशा प्रकारे केली मदत. पाहा व्हिडीओ…
#Punjab मोगा में एक्टर @SonuSood ने एक युवक की जिंदगी बचाई। दो कारों के बीच टक्कर होने के फंसा था युवक। सोनू ने खुद युवक को बाहर निकाला और अपनी कार से हॉस्पिटल लेकर पहुंचे। फिलहाल, युवक की हालत खतरे से बाहर।#SonuSood #PunjabAccident #Moga pic.twitter.com/Bz22oAOPrd
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) February 8, 2022