Home मनोरंजन ‘त्या व्हिडिओमध्ये मार खाणारा मी नाही’, अजय देवगणचे स्पष्टीकरण

‘त्या व्हिडिओमध्ये मार खाणारा मी नाही’, अजय देवगणचे स्पष्टीकरण

307
0
Ajay devgan
अजय देवगण

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील असून व्हिडिओत दोन गटांमध्ये मारहाण होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मार खानारा व्यक्ती हा बॉलिवूड अभिनेता अजय देवगण असल्याचा दावा केला जात होता. आता या व्हिडिओमध्ये अजय नसल्याचे स्वतः अजयनेच स्पष्ट केले आहे. अजयने ट्विटरवर यासंदर्भात एक ट्विट करून त्याचा आणि या व्हिडिओचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

अजय देवगणने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ”माझ्याच सारखा दिसणारा एक व्यक्ती अडचणीत सापडला आहे. मला याबाबत सतत फोन येत आहेत. मी कुठेही प्रवास केलेला नाही. माझ्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या खोट्या आहेत. ”

तसेच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजयच्या टिमकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देतानाचे एक पत्रक देखील जारी करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी अजय गेल्या वर्षभरात एकदाही दिल्लीला गेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. ”तान्हाजी” चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो शेवटचा दिल्लीला गेला होता. त्यामुळे दिल्लीत घडलेल्या घटनेचा अजयशी काहीही संबंध नाही. व्हिडिओतील व्यक्ती हा अजय नाही. त्यामुळे त्याचे नाव वापरून खोटी अफवा पसरवू नये. यानंतरही कोणीही अजयचे नाव वापरून खोटी माहिती परसवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात अधिकृत तक्रार केली जाईल. असे त्याच्या टिमकडून सांगण्यात आले आहे.

सोशल मिडियावर एका युजरने पोस्ट केलेला तो व्हिडिओ दिल्लीतील एका पब बाहेरील असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओमधील वाद कार पार्कींगवरून झालेला असून तो मारहाणीपर्यंत पोहचला. व्हिडिओमध्ये घटनास्थळी दारूच्या नशेत अजय देवगण असल्याचा दावा केला जात होता. व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाहिये. पण ज्या व्यक्तीला मारहाण होतं आहे, त्या व्यक्तीची पर्सनालिटी अभिनेता अजय देवगणशी मिळती जुळती आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. त्यावर नशेत असणारा व्यक्ती अजय देवगण आहे का? असा देखील प्रश्न त्याने विचारला होता. त्यानंतर तो व्यक्ती अजय नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Previous articleआमदारच्या ड्रायव्हरकडे सापडलं एक कोटीचं घबाड
Next articleअभिजीत बिचुकले पुन्हा मैदानात; पंढरपूर पोटनिवडणुकीत नशीब आजमवणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here