२००७ साली प्रदर्शित झालेला अभिनेता आमिर खान आणि दर्शिल सफारीचा ”तारे जमीन पर” या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली तसेच या चित्रपटाने बरेच पुरस्कार आपल्या नावी केले आहेत. बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. डोळे पाणावरणारा अशा या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना भारावून सोडले. चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी आमिर खान आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्यामध्ये चित्रपटाच्या क्रेडिटवरुन वाद झाला होता. चित्रपट प्रदर्शनावेळी निर्माण झालेला वाद चौदा वर्षांनंतर पुन्हा एकदा समोर आला आहे.
दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी नुकतीच त्यांच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या सायना या चित्रपटाबाबत एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ”तारे जमीन पर” चित्रपटादरम्यान त्यांच्यातील आणि आमिर खानमध्ये क्रेडीटवरून झालेल्या वादावर प्रश्न विचारण्यात आला. यावर अमोल यांनी वक्तव्य केले आहे. यावर ” या घटनेला आता बराच काळ उलटून गेला आहे. त्याचा आता मला काहीही फरक पडत नाही. सूर्यास्तानंतर सूर्योदय होतोच. मी भूतकाळात रमत बसणारी व्यक्ती नाही, जी सतत दुःखाचे कढ उकळत बसेल. आलेला प्रत्येक दिवसावर मी विश्वास ठेवतो आणि मी प्रत्येक दिवस एक आव्हान म्हणून स्वीकारतो. जे झालं त्याला 14 वर्षे होऊन गेली आहेत.” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
काय होता आमिर आणि अमोल यांच्यातील वाद?
दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी ”तारे जमीन पर” यांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देण्यात आली होती. चित्रपटाचा बहुतांश भाग अमोल यांनी दिग्दर्शिक केला. परंतू काही कारणास्तव त्यांच्यात आणि अमोलमध्ये काही वाद झाले होते. त्यामुळं शेवटच्या क्षणी आमिरने अमोल यांना दिग्दर्शकपदावरुन काढून स्वत: दिग्दर्शक म्हणून आपलं नाव लावलं, असा आरोप अमोलने 14 वर्षांपूर्वी केला होता. या चित्रपटात अमोल यांना लेखक आणि केएटिव्ह दिग्दर्शक म्हणून उल्लेख करण्यात आला होता.
याशिवाय चित्रपटाची पटकथा देखील अमोल यांनीच लिहिली होती. या कथेसाठी त्यांची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. तसेच त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले होते.