Home मनोरंजन अंकिता आणि रिया सुशांतसाठी झाल्या हळव्या, दोघींनी शेअर केल्या काही खास आठवणी

अंकिता आणि रिया सुशांतसाठी झाल्या हळव्या, दोघींनी शेअर केल्या काही खास आठवणी

238
0
ankita, sushant, rhea
अंकिता, सुशांत, रिया

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी सुशांतच्या अचानक जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. सुशांतची अशी अचानक एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावणारी होती. आज त्याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचला सुशांत सर्वांच्या मनात घर करून गेला. दिवंगत अभिनेत्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मिडियावर त्याचे चाहते त्याचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. सुशांतची अतिशय जवळीची मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देखील सुशांत सोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

दिवंगत अभिनेत्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अंकिताने सुशांतच्या आठवणीतले दोन व्हिडिओ शेअर करत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यातील पहिला व्हिडिओमध्ये दोघांचेही जुने फोटोज आहेत. अंकिताने शेअर केलेला हा व्हिडिओ अतिशय भावनिक आहे. त्यावर ‘असा होता आमचा प्रवास’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत-अंकिताचे एकत्र अनेक क्युट फोटोज आहेत. अंकिताने सुशांतसोबत व्यतीत केलेल्या खास क्षणांचा हा व्हिडीओ आहे. अंकिताने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सुशांतसोबत डान्स करत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

तर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सुशांतच्या मृत्यूनंतर बरीच चर्चेत आली होती. तिनेही आज सुशांतच्या आठवणीतला एक फोटो शेअर करत त्यावर भावनिक कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ”तू इथे माझ्यासोबत नाहीस असं वाटणारा एक क्षणही गेला नाही. बरेच लोक म्हणतात की वेळ सर्वकाही ठिक करतो, परंतु तू माझा वेळ होता आणि सर्वकाही होतास. मला माहित आहे की आता तू आपल्या दुर्बिणीद्वारे चंद्रापासून माझे रक्षण करतो आहेस. मी दररोज तुझी येण्याची वाट पाहते. मला माहित आहे की तू माझ्याबरोबर आहेस. ‘

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

सुशांतच्या मृत्यूनंतर गेल्या वर्षभरात खरं तर अंकिताने सुशांतची आठवण काढली नाही असा एकही दिवस गेला नाही. अंकिताने अनेकदा सुशांतबरोबर आपल्या जुन्या आठवणी सोशल शेअर केल्या. पण आज सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त तिने हे खास काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिता सुशांतसोबत सहकलाकार होती. या मालिके दरम्यान या दोघांचे प्रेम जुळले आणि तब्बल सहा वर्षे हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ साली काही वैयक्तिक कारणाने ते वेगळे झाले. तर अंकिता सोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत रियासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

Previous articleकोरोना महामारीनंतर आता सायबर हल्ल्यांची लाट
Next articleआत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला महल्ले दाम्पत्यानी दिली नवी ओळख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here