आलिया भटचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा नुकताच येऊ घातलायं. मात्र हा सिनेमा येण्याआधी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे, त्या गंगूबाई यांच्या कुटुंबावर सध्या एक नवीन समस्या उद्भवली आहे. इतकच कायं तर या साऱ्या समस्येपासून वाचण्यासाठी त्यांच कुटुंब सध्या वारंवार आपलं बस्तान बदलत आहे.
गंगूबाई यांनी चार मुलांना दत्तक घेतलं होतं. आज त्यांचा कुटुंब वाढून २० जणांच झालं आहे. इतक्या वर्षांच आपलं व्यवस्थित चाललेलं जीवन या नव्या सिनेमामुळे पेचात सापडलं आहे, अशी त्यांची भावना आहे. जेव्हा गंगूबाई या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासून या वादाला तोंड फुटले होते. इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबियांना आपल्या आईवर कोणंत पुस्तक लिहीलं गेलयं याची कल्पना नव्हती. वारंवार कोणत्या ना कोणत्या चेष्टेला तोंड देणाऱ्या त्यांच्या मुलाने आता आपल्या कुटुंबियाची अब्रू वाचवण्या हेतू कोर्टाचे दारं ठोठावलं आहे.
नैराश्यात आहे गंगूबाईचं कुटुंबीय
गंगूबाई यांचे कौटुंबिक वकिल सांगतात कि, या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यांचे कुटुंबिय सध्या चिंतेत आहे. ज्या प्रकारे या ट्रेलरमधून गंगूबाई यांचे वर्णन केले गेले आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
लोकांच्या प्रश्नांपासून वाचण्याकरता वारंवार बदलत आहेत घर
२०२० पासूनच गंगूबाईच्या कुटुंबियांने कोर्टात धाव घेतली होती. जेव्हा सिनेमाच्या प्रोमोसोबत त्यांच्या आईचा फोटो दाखवण्यात आला होता. त्यादरम्यान त्यांना लोकांकडून तसेच आप्तस्वकीयांकडून विविध प्रश्न विचारले जात होते. यासर्वापासून आपला बचाव करण्याकरिता ते नेहमी अंधेरी, बोरिवली अशा भागांमध्ये आपले कुटुंब शिफ्ट करत असत. त्यांनी यासंदर्भात संजय लीला भंसाळी व लेखक हुसैन झैदी यांना नोटीस पाठवली आहे, मात्र त्यांना कोणतेही उत्तर आलेले नाही.
कामाठीपूरात राहणारी प्रत्येक स्त्री वैश्या कशी?
गंगूबाई यांची नात भारती म्हणते कि, माझी आजी कामाठीपूरात राहत होती. याचा अर्थ असा नव्हे कि ती वैश्या होती. माझ्या आजीने चार मुलांना दत्तक घेतलं होतं. जे वैश्यांचीच मुलं होती.
आमची अब्रू चव्हाट्यावर मांडण्यात आली…
“एका बाजूला आम्ही आमच्या आजीचे किस्से अभिमानाने सांगायचो, मात्र जेव्हापासून या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे तेव्हापासून आम्हाला शरमेनं मान खाली घ्यावी लागत आहे. माझ्या आजीने कामाठीपुरातल्या वैश्या पुनर्वसनासाठी आपलं आयुष्य वेचलं होतं. मात्र या लोकांनी (सिनेमा बनवणाऱ्यांना उद्देशून) आमच्या आजीला डायरेक्ट वैश्याच बनवून टाकलं.” असे भारती यांनी सांगितले.
त्यामुळे आता गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा प्रदर्शित होतो कि नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.