Home मनोरंजन ऍडव्हेंचर कॉमेडी ‘हेलो चार्ली’चा ट्रेलर प्रदर्शित

ऍडव्हेंचर कॉमेडी ‘हेलो चार्ली’चा ट्रेलर प्रदर्शित

259
0
Hello Charlie amazon prime
'हेलो चार्ली'चा ट्रेलर प्रदर्शित

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी कौटुंबिक मनोरंजनपट ‘हेलो चार्ली’ चा  ट्रेलर आज प्रदर्शित केला. या विनोदी चित्रपटात जैकी श्रॉफ, आदर जैन, एलनाज नौरोजी आणि राजपाल यादव यांच्यासोबत पदार्पण करणारी अभिनेत्री श्लोका पंडित मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पंकज सारस्वत यांच्याद्वारे दिग्दर्शित आणि एक्सेल इंटरटेनमेंटचे निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे निर्मित ‘हेलो चार्ली’ चा ट्रेलर एका ऍडव्हेंचर कॉमेडीच्या अनोख्या दुनियेत आपल्याला घेऊन जातो ज्यामध्ये गोरिल्ला टोटो आणि भोळा-भाला चार्ली (आदर जैन) यांची मजेदार केमिस्ट्री पहायला मिळेल. हा चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवत एका कुतूहलपूर्ण प्रवास घडवतो ज्यामध्ये, एक करोड़पति व्यक्ती च्या पलायन नाट्या वरून होणाऱ्या गोंधळाची संपूर्ण साखळी तयार होते आणि विचित्र अवस्था निर्माण करते. ‘हेलो चार्ली’ नक्कीच प्रेक्षकांना हसवत लोटपोट करून टाकेल.

 

या ट्रेलरविषयी अभिनेता जैकी श्रॉफ म्हणाले की, “ कोणत्याही विनोदी चित्रपटात काम करताना मला नेहमीच खूप मजा येते, मात्र तुम्हाला हे कळायला हवे की या जॉनरचा चित्रपट करणे हे खाण्याचे काम नाही. इतक्या कठीण चित्रपटाला इतक्या सोपेपणाने बनवण्याचे श्रेय दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या शानदार टीमला जाते आणि हे नमूद करतानाच, अशा प्रतिभाशाली कलाकार आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत ‘हेलो चार्ली’ मध्ये काम करण्याचा अनुभव खरोखर मजेदार होता. हे एकदम परफेक्ट बैलेंस आहे, कारण फरहान, रितेश आणि पंकज इंडस्ट्रीच्या अफलातून सर्जनशील कलावंतांमध्ये गणले जातात. दूसरीकडे आदर आणि श्लोकासोबत काम करण्याचा अनुभव खूप प्रेमळ होता. हे ज्या तऱ्हेने सेटवर एनर्जी निर्माण करतात ती कमाल आहे, कौतुकास पात्र आहे आणि खूप सुंदर आहे. आम्हाला आनंद आहे कि चित्रपटाचे अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ग्लोबल रिलीज होणार आहे, जो जगभरातील सिनेप्रेमिंना खळाळून हसवेल.”

ट्रेलरचे अनावरण होताना अभिनेता आदर जैनने मोठ्या उत्साहाने सांगितले की, “मी या गोष्टीमुळे प्रचंड रोमांचित झालो आहे की आमच्या ट्रेलर आला आहे आणि अखेरीस प्रेक्षकांना ‘हेलो चार्ली’ च्या अनोख्या जगाची झलक पहायला मिळणार आहे. मी जैकी सर, फरहान सर, रितेश सर, पंकज सर, श्लोका आणि टीमच्या बाकी सदस्यांसोबत काम करताना धमाल वेळ घालवला आहे. आम्ही हा चित्रपट पूर्ण मनाने आणि प्रामाणिकपणाने बनवला आहे. आम्हाला आशा आहे की या कि या ट्रेलर सोबतच ९ एप्रिल, २०२१ ला अमेझॉन प्राइम व्हिडिओ वर दाखवण्यात येणारा चित्रपट ‘हेलो चार्ली’ सर्वांना प्रचंड आवडेल.”

ट्रेलर वर बोलताना नवोदित अभिनेत्री श्लोका पंडित म्हणाली की, “संक्षेपाने सांगायचे झाले तर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आहे. ही माझा पहिलाच सिनेमा असून पहिल्याच चित्रपटात जैकी सर, आदर आणि राजपाल सरांसोबत काम करताना मी स्वत:ला सौभाग्यशाली आणि नशीबवान मानते. एक्सेल एंटरटेनमेंट आणि आमचे दिग्दर्शक पंकज सारस्वत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शिकवणारा ठरला आहे जो मी नेहमीच जपून ठेवेन. हा एक स्वप्निल अनुभव आहे की माझ्या डेब्यू फिल्मचा ग्लोबल प्रीमियर होतो आहे मी याहून अधिक कसलीच अपेक्षा केली नव्हती.”

भारतासोबतच अन्य २४० देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम सदस्य ९ एप्रिल, २०२१ ला या चित्रपटाचा ग्लोबल प्रीमियर पाहू शकतील.

Previous articleनेपोटिझमची चिंता नाही, करण जोहर करतोय आणखी एका स्टार किडला लॉंच
Next articleमहिला सावकाराकडून संतापजनक प्रकार, व्याज वसुलीसाठी महिलेला अमानुष मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here