Home मनोरंजन नेपोटिझमची चिंता नाही, करण जोहर करतोय आणखी एका स्टार किडला लॉंच

नेपोटिझमची चिंता नाही, करण जोहर करतोय आणखी एका स्टार किडला लॉंच

धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीच्या माध्यमातून करण जोहर करणार शनाया कपूरला लॉंच

361
0
shanaya kapoor
शनाया कपूर

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रनौतने निर्माता करण जोहर हा फक्त स्टार किड्सला बॉलिवूडमध्ये लॉंच करत असल्याचे सांगितले. तिथंपासून अनेकांनी बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा मुद्दा उचलून धरला. नेपोटिझमबाबत करणवर अनेकांनी टिका केल्यानंतर आता पुन्हा एकदा तो एका नव्या स्टार किडला लॉंच करण्याच्या तयारीला लागला आहे.  ही स्टार किड दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आहे. करण जोहर आपल्या धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीच्या माध्यमातून नवीन चेहऱ्यांची ओळख करून देतो. त्यामुळे आता शनाया देखील लवकरच धर्मा प्रोडक्शन्सच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

shanaya kapoor
शनाया कपूर

 

बऱ्याच काळापासून शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगत होती. अखेर आज ही चर्चा खरी ठरली आहे. अभिनेता आलिया भट, अभिनेता वरूण धवन सारख्या स्टार किड्सला बॉलिवूडमध्ये लॉंच करणारा करण आता शनाया कपूरला देखील बॉलिवूड लॉंच करणार आहे. धर्मा प्रोडक्शन्सच्या बॅनरव्दारे शनायाला करण्यात लॉंच येणार असल्याचे समोर आले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharma Productions (@dharmamovies)

 

धर्मा प्रोडक्शन्सच्या सोशल मिडिया माध्यमातून शनायाने धर्मा प्रोडक्शन्सला साईन केले असल्याचे सांगण्यात आले आहे. धर्मा प्रोडक्शन्सच्या इन्स्टाग्राम पेजवरून शनायाचे काही फोटोज आणि एक व्हिडिओ अपलोड करत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच #DCASquadमध्ये शनायाचे स्वागत असल्याचेही या पोस्टवर लिहिले आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा येत्या जुलै महिन्यात होणार असल्याचे या पोस्टवरून कळते. याशिवाय शनायाने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

 

 

शनाया बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारी करत होती. काही महिन्यांपूर्वी जेव्हा शनायाने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केले होते तेव्हापासून तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तिने अभिनेत्री जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला ”गूंजन सक्सेना : द कारगिल गर्ल” या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. सध्या अनेकांकडून शनायावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

karan johar
करण जोहर

करण जोहरने आजवर आलिया भट, वरूण धवन, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, ईशार खत्तर सारख्या स्टार किड्सला करणने बॉलिवूडमध्ये लॉंच केले आहे.

 

 

Previous article‘भारतात सर्वांना लस नाहीच’, खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नामुळे पंतप्रधान मोदींच्या दाव्याची हवा निघाली
Next articleऍडव्हेंचर कॉमेडी ‘हेलो चार्ली’चा ट्रेलर प्रदर्शित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here