चित्रपटांमध्ये नेहमीच कलाकारांना आपण हिरोंच्या भूमिकेत पाहत असतो. पण हे कलाकार फक्त चित्रपटातच हिरो म्हणून तर गरज भासल्यास हेच कलाकार खऱ्या आयुष्यात देखील हिरो म्हणून सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असतात. गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूच्या या संकटात अनेक कलाकारांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार दर्शवला आहे. अशातच दाक्षिणात्य अभिनेता यश देखील चित्रपटसृष्टीतील कर्माचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. यश साऊथ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या तीन हजार कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे.
यशने सोशल मिडियाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीतील कर्मचाऱ्यांना मदत करणार असल्याची माहिती दिली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील एकूण तीन हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये यश जमा करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. या तीन हजार कर्मचाऱ्यांसाठी तो एकूण दीड कोटींची करणार आहे. त्याने सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, ”कोरोनाचा देशभरातील असंख्य लोकांच्या रोजीरोटीवर विपरित परिणाम झाला आहे. माझ्या स्वत:च्या कन्नड चित्रपटसृष्टीवर देखील याचा वाईट परिणाम झाला आहे. अशा वाईट काळात मी ठरवले आहे की चित्रपटसृष्टीतील तीन हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात मी आजपर्यंत कमावलेल्या कमाईतील काही पैसे म्हणजेच या तीन हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये या महिन्यात त्यांच्या खात्यात जमा करेन. यात चित्रपटसृष्टीतील २१ विभागांचा समावेश असेल. मला माहित आहे की आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानाचे आणि दुःखाचे निराकरण होऊ शकत नाही. पण हा एक आशेचा किरण आहे.” यश हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारा अभिनेता आहे. त्याच्या या निर्णयाने सोशल मिडियावर त्याचे भरभरून कौतुक होताना दिसत आहे. केवळ साऊथमध्येच नाहीतर बॉलीवूडमध्येही त्याचा चाहतावर्ग मोठा असल्याने बॉलिवूडकरांकडूनही त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे.
View this post on Instagram
कोरोना गेल्या वर्षभरात मनोरंजन क्षेत्र पूर्णपणे ठंडावले आहे. मनोरंजन क्षेत्राची अवस्था फारच दयनीय झाली आहे. त्यामुळे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या विविध कामगारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याकाळात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीही ठप्प झाली आहे. दैनंदिन कमाईवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावं लागत आहे. अशा परिस्थितीत सुपरस्टार यशने या कर्मचाऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.