मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून आपल्या दिलखेच अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री मानसी नाईक. मानसीने अलिकडेच प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली आहे आणि तिने तिच्या नव्या प्रवासाला सुरवात केली आहे. सोशल मिडियावर या नवविवाहित कपलचे फोटोज चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नानंतरच्या तिच्या अनेक लूक्सची चर्चा झाली. मानसीचा लग्नानंतर मंगळसूत्र, चूडा, सिंदूर असा सुंदर लूक सध्या पाहायला मिळतोय. मानसीचा नवरा हा मुळचा हरियाणाचा असल्यामुळे लाल रंगाच्या चुडा घालण्याची हौस सध्या ती पूर्ण करतेय. सध्या ती तिच्या सर्वच आऊटफीटवर मंगळसूत्र आणि चूडा घालताना दिसून येते.
View this post on Instagram
View this post on Instagram
नुकतेच तिने परिधान केलेल्या ड्रेसची, त्या ड्रेसवर तिने घातलेल्या स्पेशल चुड्याची विशेष चर्चा रंगलीये. मानसीने नुकतीच मिर्ची म्युझिक अवॉर्ड मराठी २०२१ ला हजेरी लावली होती. यावेळी तिने एका नामवंत ब्रॅंडचा ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने स्पेशल कस्टमाईज केलेला चुडा घातला होता. या कस्टमाईज चुड्याची चर्चा सध्या मनोरंजन क्षेत्रात होत आहे. या चुड्यावर तिचे आणि तिचा नवरा प्रदीपचे काही फोटोज आहेत. हा चुडा घालून तिने काही फोटोज देखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मानसीने या चुड्यावरील फोटोशूट चक्क बाथरूममध्ये केलेले आहे. फोटोज कुठेही काढले असले तरीही फोटोजमधील तिचा हॉट लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलोय.