अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर पुष्पा या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून कोटयवधींची कमाई केली. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा गाजतो आहे. सिनेमाचे स्टंट, व्यक्तीरेखा, गोष्ट आणि अल्लू अर्जुनची अभिनयक्षमता या तिन्ही गोष्टींची लोकांमध्ये फार क्रेझ निर्माण झाली आहे. मात्र या साऱ्यांमध्येसुद्धा भाव खाऊन जात असलेली एक प्रमुख गोष्ट म्हणजे पुष्पा सिनेमाची गाणी. सिनेमांच्या गाण्यांवर बनवलेले रिल्स समाजमाध्यमांमध्ये बरेच व्हायरल होत आहेत. सामी सामी, ये बिड्डा यह मेरा अड्डा, श्रीवल्ली आणि ओ अंटावा या गाण्यावर बऱ्याच तरूण तरूणींनी रिल्स बनवले आहेत. रिल्ससोबत या गाण्यांची प्रादेशिक भाषांमधली व्हर्जन्ससुद्धा फार गाजत आहेत. महिनाभरापूर्वी आलेलं श्रीवल्ली गाण्याचं मराठी व्हर्जनसुद्धा फार लोकप्रिय झालं होतं. मात्र थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये… श्रीवल्लीनंतर आता ओ अंटावा या गाण्याचंसुद्धा मराठी व्हर्जन समाजमाध्यमातून बरंच व्हायरल होत आहे…
तुम्ही सुद्धा ऐका… नी पाहा आवडतयं का ?
दोन लाख प्रेक्षकांनी पाहिलं हे गाणं
ओ अंटावा या गाण्याचं हे मराठी व्हर्जन युट्यूबवर 3 FOR YOU ENTERTAINMENT या चॅनलवर अकरा दिवसांपूर्वी म्हणजेच १६ जानेवारी २०२२ रोजी अपलोड करण्यात आलयं. या गाण्याचे लिरिक्स हे अशपाक, प्रितम कांबळे व सुजित खानझोडे यांनी लिहिलेले असून स्वत: अशपाक यांनी हे गाणं गायलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला युट्यूबवर दोन लाखांहून अधिक व्हयूज मिळाले आहेत.
ओ अंटावाच्या पूर्णत: विरूद्ध गाणं
मूळचं तेलूगू असलेलं ‘ओ अंटावा’ हे गाणं हे एक स्त्री बोलत असल्याचे आपल्याला सिनेमातून दिसतं. अभिनेत्री सांमथावर चित्रित झालेल्या गाण्याद्वारे पुरूषांच्या लबाडप्रवृत्तीचं रंजनात्मक वर्णन करण्यात आलयं. मात्र ओ अंटावाच्या मराठी व्हर्जनमध्ये हे गाणं चक्क एक मुलगा म्हणत असल्याचे दाखवून तो एका मुलीला प्रेमासाठी विनवण्या करत असल्याचे दाखवले आहे.