महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव फारच वेगाने वाढत आहे. सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत हा कोरोना पसरत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अभिनेता अक्षय कुमार, आमिर खान, विक्की कौशल, रणबीर कपूर, अभिनेत्री भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी यांच्यासोबत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नुकतीच अभिनेता मिलिंद सोमनला देखील कोरोनाची लागल झाली होती. जेव्हा मिलिंदला तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले तेव्हा त्याने लगेचच सोशल मिडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याची माहिती देत स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले होते. आता मिलिंद त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. मिलिंदची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याच्यासोबतच त्याची पत्नी अंकीताचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याने सोशल मिडिया अंकीतासोबत फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. याशिवाय त्याचा क्वारंटाईन काळातील अनुभव देखील या पोस्ट चाहत्यांना शेअर केला आहे.
View this post on Instagram
सोशल मिडियावर एक फोटो शेअर करत मिलिंदने आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असताना त्याची पत्नी अंकिताने त्याची खूप काळजी घेतली. त्याचबरोबर या पोस्टमधून मिलिंदने आपल्या चाहत्यांसाठी स्पेशल काढाही सांगितलाय. त्याने लिहिले आहे की, ” आपल्या सर्वांच्या निरंतर प्रार्थना आणि सकारात्मकतेसाठी धन्यवाद. आता क्वारंटाईन संपले आहे, माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ” ही माहीती देत त्याने अंकीताचेही आभार मनाले आहेत. ”अंकिताचे आभार, कारण ही माहिती मिळताच ती गुवाहाटीवरुन आली. मी तिला नको सांगितलं होतं पण तिने एखाद्या परीप्रमाणे माझी काळजी घेतली, जेव्हा तिने हे पाहायला हवं होतं की ती कायम सुरक्षित राहील”, अशा शब्दात मिलिंदने आपल्या पत्नीचे आभार मानले आहेत.
याशिवाय मिलिंदने क्वारंटाईन असताना तो काढा देखील घेत असल्याचे सांगितले आहे. त्याने त्याच्या चाहत्यांसोबत याची रेसेपी देखील शेअर केली आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला क्वारंटाईन असताना काय केले असे प्रश्न विचारले होते. त्यावर त्याने स्पेशल काढ्याची रेसेपी सांगितली आहे. आठवडाभर त्याला वास येणं बंद झालं होते याशिवाय त्याला कोरोनाची इतर कोणतेही लक्षणे नव्हती असेही त्याने सांगितले. तसेच याकाळात त्याने औषधांऐवजी ब्लड थिनर घेतले होते. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या डॉक्टारांचेही आभार मानले आहेत.