देसी गर्ल प्रियांका चोप्राने नुकतेच तिच्या सोशल मिडियावर ती १९ वर्षांची असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. प्रियांका या फोटोमध्ये बोल्ड अंदाजात दिसून येत असून यामध्ये ती काहीशी वेगळ्या अंदाजात दिसून येतेय. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा बिकीनी टॉप आणि पांढरी पॅन्ट घातली आहे. विशेष म्हणजे या बिकीनीवर तिने टिकली लावली आहे. बोल्ड कपडे घातले असताना त्यावर तिने टिकली लावली आहे. आणि यासाठी तिने स्वतःचीच प्रशंसा स्वतःच्याच शब्दात केली आहे.
पीसीने वयाच्या १९ व्या वर्षाची असतानाचा थ्रोबॅक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि सध्या तो फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतोय. प्रियांका या फोटोमध्ये खूप बोल्ड आणि बिधास्त अंदाजात दिसतेय. तिचा हा बोल्ड आणि बिधास्त अंदाजाचा तिच्या या फोटोच्या कॅप्शनमधून देखील दिसून येतोय. खरंतर या फोटोमध्ये ती फारशी ओळखून येत नाहीये. प्रियांकाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये ”लाजणं? याबद्दल कधी एकलं नाही?” लिहिले आहे. तसेच पुढे या फोटोवर तिने #बिंदीअॅण्डबिकीनी असे हॅशटॅग दिले आहे. खरंतर या हॅशटॅगमुळेच हा फोटो व्हायरल होतोय. आतापर्यंत या फोटोला १७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याआधीही अनेकदा वेस्टर्न कपड्यावर प्रियांकाने टिकली लावणं पसंत केले आहे. पण हा फोटो तिने दिलेल्या कॅप्शनमुळे खास ठरला आहे.
View this post on Instagram
प्रियांकाने २००० साली ‘मिस वर्ल्ड‘चा किताब जिंकला होता. तिचा हा फोटो त्याच २००० सालाच्या आसपासच्या वर्षांत काढलेला असल्याचे दिसून येते. प्रियांकाचा हाच बिंधास्त अंदाज आज तिच्या प्रसिद्ध आणि सक्सेसफुल असणाचे मुळ कारण आहे.
View this post on Instagram
आपल्या अभिनयाची छाप प्रियांकाने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत पोहचली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या आयुष्यावर आधारित ‘अनफिनिश्ड‘ हे पुस्तक लॉंच केले. याशिवाय नुकतेच तिने न्यूयॉर्कमध्ये स्वतःचं ‘सोना‘ हे भारतीय रेस्टॉरंट सुरू केले आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या भारतीयांना या रेस्टॉरंटमध्ये भारतीय जेवणाचा स्वाद घेता येणार आहे.