Home मनोरंजन ‘राम’ चा RRR मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

‘राम’ चा RRR मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

278
0
ram charan
राम चरण

दिग्दर्शक एसएस राजमौली यांचा ”बाहूबलीः द कनक्यूजन” या चित्रपटानंतरचा मोस्टअवेटेड चित्रपट म्हणजे ‘आरआरआर’. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. नुकताच या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा दाक्षिणात्य अभिनेता राम चरण तेजाचा या चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. रामचरणचा आज वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटातील त्याचे लूक पोस्टर चाहत्यांसमोर आणले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना खास भेट मिळाली आहे.

अभिनेता राम चरणने त्याच्या सोशल मिडियावर या चित्रपटातील लूकचं पोस्टर शेअर केलं आहे. त्याच्या या लूकला चाहत्यांकडून फार पसंती मिळतेय. हे पोस्टर शेअर करताना त्याने ” शौर्य, सन्मान, प्रामाणिकपणा, एक व्यक्ती जो या सर्वांची व्याख्या सांगेल. अल्लूरी सीतारामाराजू ही भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्यचं आहे.” असे कॅप्शन दिले. या पोस्टरमध्ये त्याच्या हातात धनुष्य, गळ्यात रूद्राक्षांची माळ, लांब केस असा एखाद्या योद्ध्यासारखा त्याचा हा लूक पाहायला मिळतोय. चित्रपटात राम चरण, भगवान श्री राम यांची भूमिका साकारत आहे. रामच्या लूकची सोशल मिडियावर बरीच तारिफ होताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

राम चरणसोबत या चित्रपटात अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री आलिया भट आणि दाक्षिणात्य ज्युनियर एनटीआर देखील मुख्य भूमिकेत आहेत. राम चरणचे पोस्टर प्रदर्शित करण्याआधी अभिनेत्री आलिया भटच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात आलिया सीताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून आलिया आणि अजय देवगन तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

एस एस राजमौली दिग्दर्शित हा चित्रपट एक पिरीएड ड्रामा आहे. प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या तरूणपणीच्या दिवसांचे काल्पनिक वर्णन यात केलेले आहे. या भूमिका रामचरण आणि दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर साकारत आहेत. येत्या १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट एकूण १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Previous articleस्टेडीयममध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून टीम इंडीयाच्या चाहत्याने केले असे काही
Next articleवर्क फ्रॉम होमचा कंटाळा आलाय तर आता करा ‘वर्क फ्रॉम नेचर’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here