
हिंदी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला तिचे पती राज कुंद्रा याच्या कृत्यामुळे अनेक कटु दिवस पहायला मिळाले आहेत. पॉर्नोग्राफी केसमध्ये जेलमध्ये गेलल्या आपल्या पतीच्या कृत्यावर शिल्पा शेट्टीने आपली बाजू मांडण्यास नकार दिला आहे. या घटनेवर अजूनही मी काही बोलले नाही, यापुढेही काही बोलणार नाही अशी भुमिका घेतल्याचे तिने आपल्या अधिकृत सोशल मिडीया हँडलवर पोस्ट करत जाहीर केले आहे.
मी कायद्याचे पालन करणारी व मागील २९ वर्षांपासून काम करणारी प्रोफेशनल महीला आहे. ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यांचा विश्वास कधीही तोडलेला नाही. त्यामुळे माझा मुंबई पोलीस व आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. काही दिवसात सत्य आपल्या समोर येईल. तोपर्यंत आपण माझ्या कुटुंबाला व माझ्या खासगी जीवनाचा सन्मान करावा, अशी तिने अपेक्षा व्यक्त केली आहे.
My statement. pic.twitter.com/AAHb2STNNh
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) August 2, 2021
एक सेलेब्रिटी या नात्याने कधी तक्रार करु नये आणि कोणती सफाई देखील करु नये ही भुमिका तिने घेतली आहे. एक आई या नात्याने माझ्या मुलांच्या खासगी जीवनावर परीणाम करण आपण बंद करा अशी विनंती तिने केली आहे. अर्धसत्य जाणून त्यावर आपली मत कोणीही बनवू नका असेही तिने सांगितले आहे.