Home मनोरंजन “दि ग्रेट इंडियन किचन” चित्रपट समीक्षण

“दि ग्रेट इंडियन किचन” चित्रपट समीक्षण

415
0
the great indian kitchen cinema review
प्रातिनिधिक छायाचित्र

“दि ग्रेट इंडियन किचन”

तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातली गोष्ट…

घराचं घरपण हे बर्‍याचदा स्वयंपाकघरावर सुद्धा अवलंबून असतं आणि खरंय ना आपलं स्वयंपाकघर जितकं सदृढ तितकच आपलं घर सदृढ राहतं. अहो भिंतींना नुसते कान असतात, पण स्वयंपाकघरात घराचा खरा आत्मा वसतो.

अश्याच एका सामान्य घरातली ही एक सामान्य गोष्ट. नवविवाहीत दांपत्य नुकतचं घरात नांदू लागलयं. सुरूवातीला सारंकाही आलबेल असतं. घरात दरदिवशी चमचमीत पदार्थ बनत असतात. सुनेवर साक्षातः अन्नपूर्णा असल्याचा शिक्का बसतो.
सारंकाही अगदी दृष्ट काढण्याजोगं घडत असतं.

मात्र जसा सिनेमा पुढे सरकतो तसं आपल्याला या सार्‍या आनंदी वातावरणामागचा खरा एकाकीपणा कळतो. सार्‍या स्वयंपाकघराची जबाबदारी ही फक्त एकटी सून सांभाळत असते आणि ते ही आपली करियरची सारी स्वप्न बाजूला सारून. ना तिच्या मदतीला कुणी असतं किंवा तिने कोणाकडे मदत मागितली तर ना कुणी तिच्या मदतीला येतं.
हळूहळू तिचा सहनशीलतेचा बांध अगदी काठोकाठ भरतो आणि कालांतराने त्याचा फारमोठा विस्फोट होतो.

“स्त्रियां समस्तः सकल जगस्तु” असं म्हटलं तरी आपल्याकडची पुरूषप्रधान संस्कृती ही अजूनही म्हणावी तितकी कमी झालेली नाही.
आणि दिग्दर्शक जियो बेबीने हा मुद्दा अगदी ठळकपणे आपल्यापर्यंत पोहोचवलायं.

मला या सिनेमातली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, यातील पात्रांना नावच नाही आहेत आणि इतकं असूनसुद्धा संवादफेक इतकी सुरळीतरित्या पुढे सरकते की त्याला तोडच नाही.

स्त्री ला गृहीत धरणार्‍या प्रत्येक पुरूषाच्या कानाखाली जाळ काढण्याचं काम या सिनेमानं अगदी पद्धतशीर केललं आहे.

वेळ मिळाल्यास नक्की बघा…

“दि ग्रेट इंडियन किचन”

Previous articleराज्यासाठी लाल परीच ठरली प्राणवायूची सारथी
Next articleकोरोना हे बायोटेररिझमचं व्हेपन – धनराज वंजारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here