Home ताज्या बातम्या बुक्कीत टेंगूळ देणारा टिकटॉक स्टार सूरज चव्हाण रुपेरी पडद्यावर झळकणार

बुक्कीत टेंगूळ देणारा टिकटॉक स्टार सूरज चव्हाण रुपेरी पडद्यावर झळकणार

221
0
टिकटॉक स्टार सूरज चव्हाण आता दिसणार रुपेरी पडद्यावर

आपल्या अभिनयाच्या कलेला लोकांपुढे सादर करण्यासाठी अनेक कलाकारांनी टिकटॉक ॲपचा आधार घेतला. असाच एक कलाकार सूरज चव्हाण याने आपल्या अलग अदांजातून रसिकांची मन जिंकून घेतली व आज बुक्कीत टेंगूळ देणारा सूरज चव्हाण रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे निर्मित का रं देवा या आगामी मराठी चित्रपटात सूरज चव्हाण आपली कला साकारताना दिसणार आहे. गोलीगत आणि बुक्कीत टेंगुळ या आपल्या अनोख्या डायलॉगने लोकांना खळखळून हसवणारा सूरज या चित्रपटात थेट हिरोच्या भुमिकेत येणार आहे.

शारीरीक व्यंगाला योग्यरित्या प्रसिद्ध करत सूरजने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकप्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. सूरज चव्हाण हा काही प्रमाणात बोबडे बोलतो. याच बोबडे बोलणाऱ्या शैलीचा वापर त्याने आपल्या व्हीडीओमध्ये केला आहे. अनोख्या अंदाजात बोलताना लोकांच्या तोंडात त्याचे वाक्य कधी बसले आणि सूरज बघता बघता टिकटॉक स्टार झाला. मूळचा पुण्यातील बारामतीचा असलेला सूरज हा लहानपणापासून अनाथ आहे. असे असले तरी अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. त्याचे हे शारीरीक व्यंगचे त्याचे नशीब पालटून टाकेल असे त्यालाही कधी वाटले नाही.

प्रशांत शिंगाटे यांच्या का रं देवा या चित्रपटात सूरजला मिळालेली भुमिका ही एका कॉलेजमधील विद्यार्थ्याची आहे. माझ्यासारख्या लिहीता वाचता न येणाऱ्या मुलाला अशी भुमिका मिळणे हे मी माझे भाग्यच समजतो असे तो मानतो. मी साकारलेली भुमिका व चित्रपटातील माझे काम हे रसिकप्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा त्यांने व्यक्त केली आहे.

याचित्रपटात त्याला अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करता येणार आह. कथा आणि दिगदर्शक रंजीत जाधव याची आहे. तर मोनालिसा बागल, मयुर लाड, जयवंत वाडकर, अरूण नलावडे आणि नागेश भोसले या कलाकारांसोबत काम करण्याची संधी सूरजला मिळणार आहे. येत्या फेब्रुवारी महीन्यात हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Previous articleबस चालवत हॉस्पिटल गाठून योगिता सातव ठरल्या बस चालकाच्या ‘देवदूत’
Next articleमहाराष्ट्रात येऊन टेस्ला कार बनवा; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची एलॉन मस्कला ऑफर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here