Home मनोरंजन हा चिमुरडा २० फूटाची शिडी अवघ्या काही सेकंदात उतरतो… त्याची ट्रिक पाहून...

हा चिमुरडा २० फूटाची शिडी अवघ्या काही सेकंदात उतरतो… त्याची ट्रिक पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

464
0

आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अर्थात त्यामध्ये काही गोष्टी या सकारात्मकही असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा एक असा पराक्रम करतोय, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

मुलं ही देवाघरची फूलं, ही म्हण तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. मात्र या चिमुरड्याने जे केलयं ते आकलनशक्तीच्या पलीकडचयं. अगदी स्पायडरमॅन प्रमाणे हा मुलगा त्या शिडीवरून धडधड खाली आला. तुम्हीच पाहा व्हिडिओ…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by memes | news | comedy (@ghantaa)

आई आहे बाजूलाच उभी

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा मुलगा अप्रतिमपणे शिडीच्या पायऱ्यांवरून खाली येत आहे. त्या मुलाची आई त्या शिडीच्याच बाजूला उभी आहे. पण आपला मुलगा त्या शिडीवरून पडेल वैगेरे याची तिला मुळीच भीती वाटत नाही. काहींना हे पाहून अप्रूप वाटेल, पण मुलांबाबत अशा प्रकारे बेफिकीर राहणे देखील अयोग्य आहे. बहुतांशी अशा घटनामध्ये जीवीतावरही बेतू शकते.

या मुलाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर या समाजमाध्यमावर बराच व्हायरल होत आहे. बहुतांशी यूझर्स या व्हिडिओला रिशेयर देखील करत आहेत. अवघ्या काही तासांपूर्वी अपलोड करण्यात या व्हिडिओला आतापर्यंत ९० हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे, तसेच सदर आकडा हा सातत्याने वाढत देखील आहे. या व्हिडिओ आलेल्या प्रतिक्रियाही या हजारांच्या घरात असून काही पालक नकारात्मक तर काही पालक सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.

अरे हा तर स्पायडरमॅनचा वंशज

या व्हिडिओवर येणाऱ्या प्रतिक्रियादेखील गंमतीशीर असून एका यूझरने तर या मुलाला स्पायडरमॅनची पदवी देऊ केलीयं. एका यूझरने ‘शाबास, मेर वीर जवान’ अशी केली असून एका यूझरने सल्ला दिलायं की, हा व्हिडिओ पाहायला गंमत वाटली, पण मूल पडलं तर काय ?

Previous articleवाईट सवयीमुळे आयुष्य झाले बेचिराख, अब्जाधीश बनला भिकारी!
Next articleश्रीवल्लीनंतर आता पुष्पातील या गाण्याचं मराठी व्हर्जनसुद्धा धुमाकूळ घालतयं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here