Home मनोरंजन गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पुष्कर-अमृता घेऊन येत आहेत ”वेल डन बेबी”

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पुष्कर-अमृता घेऊन येत आहेत ”वेल डन बेबी”

358
0
well done baby
वेल डन बेबी

गेल्या वर्षभरात इतर व्यवसायांप्रमाणे चित्रपटसृष्टीला देखील ग्रहन लागले होते. अनेक चित्रपटाचे चित्रीकरण आणि प्रदर्शन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने थांबवण्यात आले होते. या वर्षभरात बरेचशे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृह जरी बंद असली तरीही प्रेक्षकांचे मनोरंजन होणं काही थांबले नाही. यातच आता आणखी एका मराठी चित्रपटाची भर पडली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर जोग यांचा बहुप्रतिक्षित ”वेल डन बेबी” या चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून नुकतेची या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर जोग हे लवकरच ”वेल डन बेबी” या चित्रपटातून एकत्र स्क्रिनवर पाहायला मिळणार आहेत. गेले अनेक दिवस या चित्रपटाची बरीच चर्चा होती. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. येत्या ९ एप्रिलपासून हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर अॅमेझॉन प्राईमवर होणार आहे. चित्रपटाचे नवे मोशन पोस्टर प्रदर्शित करत ही घोषणा करण्यात आली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटात पुष्कर आणि अमृता या जोडपे त्यांच्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांचं नशीबच त्यांना त्यांचा उद्देशापर्यंत पोहचवते. ही कथा अतिशय गुंतवणून ठेवणारी कथा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हे परदेशात करण्यात आलेले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

पुष्कर जोगने ” तेच नाते, तेच ऋणानुबंध, पुन्हा नव्याने शोधूया…” असे कॅप्शन देत या चित्रपटाचे मोशन पोस्टर त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले आहे. तसेच अमृताने चित्रपटातील एक फोटो शेअर करत, ” लॉकडाऊन संपण्याची वाट जेवढी तुम्ही बघत आहात तेवढीच आम्ही देखील पाहत आहोत. आणि आता आपण काही दिवसातच भेटणार आहोत. स्टे ट्युन.” असे लिहून आपला आनंद तिने व्यक्त केला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शिका प्रियंका तंवर यांनी केले आहे. तसेच आनंद पंडित, मोहन नादार आणि पुष्कर जोग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Previous articleमूर्ती लहान पण कीर्ती महान, जगातील सर्वात लहान उंचीचे साधू
Next articleचौदा वर्षांनंतर अमोल गुप्तेंनी ”तारे जमीन पर” चित्रपटाबाबत केले वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here