Home मनोरंजन अभिनेत्री रश्मिका मंदानाने शेतात फिरवला नांगर, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

अभिनेत्री रश्मिका मंदानाने शेतात फिरवला नांगर, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

416
0
अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या अल्लड स्वाभावाने प्रेक्षकांच्या मनात तिने आपली जागा तयार केली आहे. रश्मिका ही सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात सक्रीय असते. नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओचे नेटकऱ्यांनी चांगलेच कौतुक केले आहे. यामध्ये एका शेतात नांगरणी करताना रश्मिका दिसत आहे. अगदी साधा पेहराव करून तिने हा व्हिडीओ काढला आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

या व्हिडीओच्या कॉमेंटमध्ये तिने आपला अनुभवही शेअर केला आहे. “गीत ऐका आणि व्हिडीओ पाहा. यापेक्षाही उत्तम काहीही असू शकत नाही. या सीनच्या शुटिंगनंतर मीसुद्धा असाच विचार करत होते. मला हे पात्र साकारण्यात किती मजा आली असेल, हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता.” अशा आशयाची नजकूर कॉमेंट लिहीला आहे. नांगर चालवताना रश्मिका मनापासून काम करताना दिसत आहे. अगदी काही वेळातच या व्हिडीओवर हजारो कॉमेंटचा वर्षाव झाला आहे. आपल्या अनोख्या अभिनयाची छबी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत उमटवून आता रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

Previous articleलसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती घ्यावी
Next articleदहावी आणि बारावीची परीक्षा होणार ऑफलाईन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here