Home मनोरंजन तब्बल ९०० टन सोनं पुरवणारी केजीएफ बंद का पडली? कारण वाचून थक्क...

तब्बल ९०० टन सोनं पुरवणारी केजीएफ बंद का पडली? कारण वाचून थक्क व्हाल…

503
0

सलाम रॉकी भाई… रॉ रॉ रॉकी. काय मग केजीएफ-२ पाहिला की नाही? पाहिला असेल अथवा नसेल पण हे गाणं सदानकदा आपल्या कानात वाजत असतं. अर्थात डायरेक्टर प्रशांत नीलची ही सारी किमया. २०१८ साली पहिला केजीएफ आला आणि भारतासह अख्ख्या जगभरात त्याने धुमाकूळ घातला. त्याचवेळेला साऱ्या प्रेक्षकांना केजीएफच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली होती. खरंतर केजीएफचा दुसरा भाग २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदर प्रदर्शन वारंवार पुढे ढकलण्यात आले. अखेर १४ एप्रिल २०२२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे केजीएफने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पहिल्या दोन दिवसातच १०० कोटीचा गल्ला या सिनेमाने जमवला.

हॉलिवूडपटांना सुद्धा लाजवणारा हा सिनेमा पूर्णपणे काल्पनिक आहे. मात्र ज्या कथेचा आधार हा सिनेमा बनवण्यासाठी घेण्यात आलाय ती कथा खरी आहे. केजीएफ अर्थात कोलार गोल्ड फिल्ड नावाची खाण कर्नाटकातील कोलार जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. १०० वर्षांपेक्षा अधिक काळासाठी या खाणीतून सोने उत्खनन केले जात होते. इतकंच नव्हे तर भारतात सर्वात आधी १८८९ सालीच कोलार येथे वीज आली होती.

म्हैसूरच्या महाराजांनी दिला खाण परवाना

जॉन नावाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याने १८७३ साली म्हैसूरच्या महाराजांकडे खाणकामासाठी परवानगी मागितली होती. महाराजांनी २ फेब्रुवारी १८७५ साली सदर परवाना जारी केला होता. त्यानंतर जॉनने सोने काढण्याचे काम सुरु केले. एकेकाळी देशाचे ९५ टक्के सोने केजीएफमधूनच बाहेर काढले जायचे.

अखेर केजीएफ बंद पाडली गेली

१९३० मध्ये कोलार गोल्ड फिल्डमधील सोन्याचा साठा कमी होऊ लागला. भारताला स्वांतत्र्य मिळेपर्यंत कोलारवर ब्रिटीशांचेच मालकी हक्क होते. अखेर १९५६ मध्ये ही खाण भारत सरकारच्या ताब्यात गेली. सध्या या खाणीचे केवळ अवशेष शिल्लक राहीले आहेत. सोने काढण्यासाठी केजीएफमध्ये खोदलेले बोगदे आता पाण्याने काठोकाठ भरलेले आहेत. तज्ञांच्या मते केजीएफमध्ये अजूनही सोने बाकी आहे. मात्र ते सोने बाहेर काढून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ते सोने काढण्यासाठी होणारा खर्च जास्त असेल. त्यामुळे एकविसाव्या शतकात परत कुणी केजीएफच्या नादाला लागत नाही. अखेर केजीएफ बंद पडली.

Previous articleडॉ. माळशिकारे यांना २२ वर्षांनी शरद पवार का आठवले?
Next articleआगळावेगळा रेकॉर्ड: ७ वर्षाच्या दिव्यांग मुलाने सर केलं हिमालयातील हे भयानक शिखर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here