अकराऐवजी साडेदहावाजताच सुरू होणार परीक्षा
लेखी परीक्षेसाठी मिळणार अर्धा तास अधिकचा वेळ
मुंबई – इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. या परीक्षा जूनमध्ये होणार असून यंदा अर्धा तास आधीच म्हणजेच सकाळी ११ ऐवजी १०.३० वाजता परीक्षेला सुरूवात होणार आहे.
लेखी परीक्षेसाठी अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक (प्रॅक्टीकल) परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. यंदा तीन तासांऐवजी साडेतीन तास परीक्षा चालणार आहे. दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. परंतु, यंदा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे अर्धा तास अधिकचा वेळ वाढवून दिल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.