मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे मुंबईतील मरीन ड्राइव्ह मधील हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाजवळ गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट आढळून आली आहे.
कोण आहेत मोहन डेलकर?
मोहन डेलकर यांनी सात वेळा दादरा नगर हवेलीचे प्रतिनिधित्व केले होते. १९८९ साली ते पहिल्यांदा दादरा आणि नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. कामगार नेता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आतापर्यंत त्यांनी काँग्रेस आणि भाजपच्या तिकीटावर ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय नवशक्ती पार्टी (बीएनपी)ची स्थापना केली होती.