Home ताज्या बातम्या मॉल फिरायला BMCची बंधनं, निगेटिव्ह रिपोर्ट द्या अन्यथा स्वॅब देणं बंधनकारक

मॉल फिरायला BMCची बंधनं, निगेटिव्ह रिपोर्ट द्या अन्यथा स्वॅब देणं बंधनकारक

मुंबईत वाढत्या करोना रुग्णांना आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवे नियम जाहीर केले आहेत. यात शहरातील सर्व मॉलमध्ये जाण्यासाठी करोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे अन्यथा स्वॅब टेस्ट करणं सक्तिचे केले आहे.

744
0
Malls in mumbai
मुंबईत आता मॉलमध्ये जाण्यासाठी करोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे अन्यथा स्वॅब टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यात करोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. यातच मुंबई शहरात करोना आकडेवारीत झपाट्याने वाढ झाली आहे. यावर आता आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने चांगलीच कंबर कसली आहे. येणाऱ्या २२ मार्चपासून शहरातील सर्व मॉल्सवर अँटीजेन टेस्ट ही सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे मॉलमध्ये फिरायला जाताना आता विचार करावा लागणार आहे.

महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही माहीती दिली आहे. मुंबई शहरात करोना रुग्णांची संख्या ज्याप्रकारे वाढते आहे ही चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे शहरातील गर्दिच्या जागेवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. याकरिता गर्दिच्या जागांपैकी एक शहरातील मॉल्सवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या २ मार्चपासून शहरातील मॉल्समध्ये जाण्यासाठी करोना निगेटिव्ह टेस्ट दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पालिकेचे एक पथक मॉलच्या मुख्य द्वारावर तैनात करण्यात येईल. त्यांच्याकडून येणाऱ्या लोकांची अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे अशी माहीती काकाणी यांनी दिली.  याबद्दलची सविस्तर माहीती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

लक्षणं नसलेल्या रुग्णांचा शोध घेणं खूप अवघड आहे. करोनाबाधित व्यक्ती जर मॉल वा इतर गर्दीच्या ठिकाणी गेली, तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आता मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा किंवा स्वॅब देणे सक्तीचं केले असल्याचे, काकाणी यांनी सांगितलं.

Previous articleआता केंद्र सरकारची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करडी नजर, सरकारने लावली नवीन नियमावली
Next articleराज्यात पुन्हा लॉकडाऊन ? राज्य शासनाची ही नियमावली जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here