कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लस सारख्याच परिणामकारक
पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे आवाहन
मुंबई – सध्या मुंबईसह देशभरात सिरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड आणि भारत बायोटिकची कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. परंतु, अनेकांच्या मनात या दोन्ही लसींच्या परिणामकारकतेबद्दल शंका आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसून जी लस उपलब्ध असेल ती घ्यावी असे आवाहन केले आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लस सारख्याच परिणामकारक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबईकरांनी सर्व नियमांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायजरचा नियमित वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे आवाहनही केले आहे.