Home ताज्या बातम्या ७६९ रुपयांचा एलपीजी गॅस आता ६९ रुपयात, जाणून घ्या ऑफर

७६९ रुपयांचा एलपीजी गॅस आता ६९ रुपयात, जाणून घ्या ऑफर

देशात मुलभूत सुविधा असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडर आता सामान्यांच्या खिशाला परवडणे कठीण झाले आहे. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत गॅस सिलिंडर खरेदी करायचा असेल तर पेटीएमने एक जबरदस्त ऑफर देऊ केली आहे. ही ऑफर नेमकी काय हे जाणून घ्या.

641
0

केंद्र सरकारकडून अनेक गोष्टींच्या दरात वाढ केली आहे. याने देशातील सामान्य वर्ग हा चांगलाच मेटाकुटीला आलाय. गॅस सिलेंडर किंमतीत मोठी वाढ झाल्याने अनेकांच्या चुलीचा प्रश्न  हा ऐरणीवर आला आहे. तब्बल ७६९ रुपयांचा सिलेंडर विकत घेण्यासाठी अनेकांना पोटाला चिमटा काढावा लागतो आहे. यावर तुम्हाला स्वस्तात सिलिंडर खरेदी करायचा असेल तर पेटीएमने एक धमाकेदार ऑफर आलीये. पेटीएम वरून एलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतर मिळणार ७०० रुपयांचा कॅशबॅक.

काय आहे ही ऑफर क्रमवार जाणून घ्या

१.ही ऑफर Paytm वर मिळत आहे. फोनमध्ये अॅप नसेल तर अॅप डाउनलोड करा.

२.युजर्संना यासाठी एलजीपी सिलिंडर पेटीएमवरून बुक करावे लागेल.

३.यानंतर मेन पेजवर दिलेल्या Recharge & Pay Bills पर्यायाला टॅप करा. त्यावर Book a Cylinder वर टॅप करा.

४.आता जे पेज तुमच्या समोर असेल यात गॅस सर्विस प्रोव्हाइडरला सिलेक्ट करा.

५.त्यानंतर आपला १७ डिजिटचा एलपीजी आयडी टाकून पुन्हा गॅस सिलिंडरला सिलेक्ट करा.

६.आता एलपीजी आयडीच्या जागी कंज्यूमर नंबर किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकू शकता. त्यानंतर प्रोसिडवर टॅप करा.

७.खाली ७६९ रुपयांची रक्कम दिसेल. तसेच खाली स्क्रॉल केल्यानंतर एक ऑफर दिसेल. ज्यात युजर्संना ७०० रुपयांचा कॅशबॅक दिली जाणार आहे.

८.या ठिकाणी खाली Apply Promocode लिहिलेले असेल त्यावर टॅप करा.

९.खाली दिलेल्या LPG ऑफर जवळ देण्यात आलेल्या Apply वर टॅप करा.

१०.यानंतर तुम्हाला पेमेंट पेजवर घेऊन जाईल त्यात ७६९ रुपयांचे पेमेंट करावे. परंतु, कॅशबॅकमध्ये तुम्हाला काही रक्कम परत मिळून जाईल. जर युजर्संना ७०० रुपयांचा कॅशबॅक परत मिळत असेल तर त्यांना गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयांत मिळेल. नोटः ७०० रुपयांचा कॅशबॅक पेमेंट एका युजरला केवळ एकदाच मिळेल. तसेच ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत उपलब्ध आहे. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस कंपनीसोबत करार केला आहे.

Previous articleया ड्रेसमुळे प्रियंका झाली ट्रोल… मिम्समुळे प्रियंकालाही हसू आवरले नाही
Next article१५ वर्षीय हार्दिकने WhatsApp ला दिली टक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here