Home ताज्या बातम्या कोरोना संकटानंतर आता औषधाचंही संकट, राज्यात रेमडेसिवीरची टंचाई

कोरोना संकटानंतर आता औषधाचंही संकट, राज्यात रेमडेसिवीरची टंचाई

247
0

राज्यातच नाही तर देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट असल्याचे चित्र जाणवते आहे. अनेक राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्र राज्य रुग्णसंख्येत देशात पहिल्या क्रमामंकावर आहे. ही चिंतेची गोष्ट असतानाच आता या रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांपुढे मांडली आहे.

 

 

या औषध संकटावर मात करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे. ज्यात केंद्र सरकारने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे रेमडेसिवीर हे औषध निर्यातीवर बंदी घातली आहे. या निर्यातदार कंपन्यांकडे या इंजेक्शनचा साठा पडून आहे. हा साठा राज्य शासनाला मिळू शकला तर पुढील काही काळ आपण या अडचणीवर मात करू शकू असा अंदाज टोपे यांनी व्यक्त आहे आहे. सध्या देशात केंद्र सात कंपन्या हे इंजेक्शन तयार करत आहेत. तर १५ कंपन्या अशा आहेत जे या इंजेक्शनचे निर्यात करतात. त्यामुळे त्यांच्याकडून हा साठा राज्याला मिळाला तर हे संकट टळू शकेल. यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कायदेशीररीत्या या गोष्टी राज्य सरकार करते आहे असे टोपे यांनी सांगितले.

 

अनेक रुग्णांना रेमडेसिवीरची गरज असतानाही औषधाअभावी योग्य वेळेत उपचार होऊ शकत नाही ही परिस्थितीत भयावह आहे. औषध मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहेच परंतु जनतेही या परिस्थितीला गांभीर्याने घेऊन सर्व निर्बंधांचे पालन करावे असे आवाहन राजेश टोपे यांनी जनतेला केले आहे.

Previous articleकोरोना रुग्णांची खर्रा, दारूची मागणी; नातेवाईकांनी कोविड सेंटरमध्ये टरबुजातून पाठवलं पार्सल
Next articleराज्यासाठी खुशखबर, आता हाफकीन तयार करणार कोरोना लस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here