Home ताज्या बातम्या आगळावेगळा रेकॉर्ड: ७ वर्षाच्या दिव्यांग मुलाने सर केलं हिमालयातील हे भयानक शिखर!

आगळावेगळा रेकॉर्ड: ७ वर्षाच्या दिव्यांग मुलाने सर केलं हिमालयातील हे भयानक शिखर!

406
0

‘डाऊन सिंड्रोम’ या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एका सात वर्षीय मुलाने हिमालयातील एक अवघड शिखर पार केले आहे. या मुलाचे नाव अवनीश असून तो इंदौरचा स्थायिक आहे. अवनीशने हिमालयातील ५५५० मीटर उंचीवर स्थित असलेल्या काला पत्थर क्षेत्राची अवघड चढाई सर केली आहे. अवनीशचे वडिल आदित्य तिवारी यांनी हा दावा केला असून त्याच्या चढाईचे सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशी कामगिरी करणारा अवनीश हा जगातील पहिला, सर्वात कमी वयाचा आणि विशेष आवश्यकता असणारा मुलगा आहे.

काला पत्थर नक्की आहे तरी कुठे!

जगातील उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्ट(८८४८.८६ मीटर)च्या पर्वतारोहण मार्गातच काला पत्थर हे ठिकाण येतं. काला पत्थरच्या शिखरावरून माऊंट एव्हरेस्टचं अक्षरश: नयनरम्य दृश्य दिसतं. पीटीआय(PTI) या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आदित्य तिवारी यांनी सांगितले की, ते अवनीशला एक वर्षापासून पर्वतारोहणचे ट्रेनिंग देत होते.

लेह लडाख आणि काश्मीर मध्ये घेतले प्रशिक्षण

अवनीश चे वडील सांगतात की, त्यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी नेपालच्या लुकला येथून डाऊन सिंड्रोम असलेल्या अवनीश सोबत चढाई सुरू केली. या मोहिमेसाठी त्यांनी अवनीश ला लेह, लडाख आणि काश्मीर येथे गेल्या एक वर्षापासून पर्वतारोहणाचे खास प्रशिक्षण दिले होते.

गाईड, शेर्पा आणि हमालांच्या मदतीने चढाई करत करत त्यांनी अवनीशला सोबत घेऊन १९ एप्रिल ला काला पत्थर सर केले. जिथे अवनीशने तिरंगा फडकावला आणि माऊंट एव्हरेस्टला दुरुनच मानवंदना दिली.

उणे १० डिग्री सेल्सिअस मध्ये केली होती मोहीम

अवनीश व त्याच्या वडिलांना काला पत्थर या ठिकाणी पोहोचण्यासाठी दररोज शून्य ते उणे १० डिग्री सेल्सिअस इतके तापमान सहन करावे लागले होते. त्यांनी सोबत खूप सारी औषध आणि वैद्यकीय उपकरणे देखील नेली होती. त्याशिवाय त्यांनी अवनीशचा एक विशेष विमा देखील उतरवला होता, ज्यात गरज पडली तर त्याला एयरलिफ्ट करून हॉस्पिटलला पोहोचवण्याची व्यवस्था होती.

काय असतो डाऊन सिंड्रोम आजार?

डाऊन सिंड्रोम हा एक आनुवांशिक आजार आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘ट्राइसोमी २१’ म्हटले जाते. या आजाराचा सामना करणाऱ्या मुलांना वेगवेगळ्या शारीरिक आणि बौद्धिक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचा आय-क्यू लेवलही खूप कमी असतो. जेव्हा आपले अपत्य स्पेशल चाईल्ड असते तेव्हा त्याचे संगोपन करणे देखील खूप कठिण असते. मात्र आदित्य तिवारी त्यांच्या मुलाचे व्यवस्थित संगोपन करतात.

Previous articleतब्बल ९०० टन सोनं पुरवणारी केजीएफ बंद का पडली? कारण वाचून थक्क व्हाल…
Next articleमंगळावर बंगला बांधायचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार… इस्रोच्या शास्त्रज्ञांनी लावला नव्या वीटेचा शोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here