Home ताज्या बातम्या पहिली ते आठवीच्या परिक्षा रद्द, शिक्षण मंत्री यांची मोठी घोषणा

पहिली ते आठवीच्या परिक्षा रद्द, शिक्षण मंत्री यांची मोठी घोषणा

322
0
पहिली ते आठवी परिक्षा रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
पहिली ते आठवी परिक्षा रद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

राज्यात कोरोनाचे रूग्न वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधीत केले आणि लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.  करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

 

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात करोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून सुरू ठेवलं. पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, तर काही ठिकाणी त्या सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकलो नाहीत. परंतू मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावे आणि मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये असा सातत्याने प्रयत्न सुरू होता. आता करोनाची परिस्थिती पाहता आणि वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, आम्ही शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी जे शिक्षण हक्क अधिकाऱाच्या अंतर्गत येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे. असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Previous articleरूपाली भोसले अडकणार लग्नबंधनात?
Next articleतो हवालदार होऊ शकला नाही, मग तोतया IPS बनून त्याने लोकांना लुटलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here