Home ताज्या बातम्या आनंद महिंद्राने पूर्ण केला आपला वादा, मिनी जीप गाडीची निमिर्ती करणारा महाराष्ट्राचा...

आनंद महिंद्राने पूर्ण केला आपला वादा, मिनी जीप गाडीची निमिर्ती करणारा महाराष्ट्राचा रँचो झाला बोलेरोचा मालक

182
0
महाराष्ट्राचा रँचो बनला बोलेरोचा गाडीमालक

स्वस्त चारचाकी गाडी, त्यातही स्वत: तयार केलेली, अशा भन्नाट कृतीतून तयार केलेल्या मिनीजीपचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हीडीओची दखल महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनीही घेतली होती. सांगली जिल्ह्यातील दत्तात्रय लोहार या व्यक्तीने आपल्या कल्पतेच्या जोरावर दुचाकीचे इंजिन, जुन्या गाडीचे बोनेट आणि रिक्षाच्या चाकांचा वापर करून किकवर स्टार्ट होणारी मिनी जीप तयार केली. आंनद महिंद्राने लोहार यांच्या कल्पकतेचे कौतुकही केले होते. इचकेच नाही तर दत्तात्रय लोहार यांना महिंद्रा कंपनीची बोलेरो कार देण्याचे आश्वासन दिले होते.

त्याप्रमाणे आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द काल खरा करून दाखवला आहे. महाराष्ट्रातील रँचोला महिंद्रा कंपनीकडून बोलेरो गाडी गीफ्ट म्हणून देण्यात आली आहे. या यशामागे दत्तात्रय लोहार यांची खडतर मेहनत, जिद्द आणि चिकाटी आहे.

 

 

कसा होता या गाडीचा प्रवास

सांगली जिल्ह्यातील दत्तात्रय लोहार यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. आर्थिकपरिस्थिती हालाकीची असल्याने नवीन गाडी खरेदी करणे शक्य नव्हते. घरगुती वापरासाठी आपल्याकडेही गाडी असावी अशी घरच्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे आपल्या कल्पतेमधून काही करण्याचा विचार लोहार यांनी केला. त्यानुसार जवळपास तीन वर्षांपासून लोहार या मिनी जिप तयार करण्यामागे लागले होते. दुचाकीचे इंजिन, चारचाकीचे बोनेट तसेच इतर काही पार्टचा वापर करून त्यांनी ही साठ हजारात गाडी तयार केली आहे.

आनंद महिंद्रांनी का केली गाडीची ऑफर

व्हायरल व्हिडीओ पाहून मंहिद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय लोहार यांचे आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे कौतुक केले. दत्तात्रय लोहार यांनी घरगुती वापरासाठी गाडी तयार केली होती. मात्र या गाडीतून त्यांची कल्पकता दिसून येते. त्यामुळे ही गाडी महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये ठेवून इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी लोहार यांच्याकडे आनंद महिंद्रा यांनी गाडीची मागणी केली होती.

अशा प्रकारच्या गाड्या सांगली जिल्ह्यात अजून दोन जणांनी तयार केल्या मात्र यात दत्तात्रय लोहार यांची चर्चा अजूनही रंगली आहे. आनंद महिंद्रा यांनी दिलेली ऑफर लोहार कुटुंबियांनी सुरुवातीला नाकारली होती. त्यानंतर कंपनीच्या टीमने लोहार कुटुंबियांशी चर्चा केली. यावर दत्तात्रय लोहार गाडी महिंद्रा कंपनीला देण्यास तयार झाले. आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काल दत्तात्रय लोहार यांना सांगली येथील सह्याद्री मोटर्स येथे बोलेरो कार सुपूर्द करण्यात आली.

Previous articleमहाराष्ट्राला भरणार हुडहुडी
Next articleवाईट सवयीमुळे आयुष्य झाले बेचिराख, अब्जाधीश बनला भिकारी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here