बँक ऑफ बडोदानं फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्रेडिट विभागातील स्पेशालिस्ट ऑफिसर पदासांठी भरती प्रक्रियेचं आयोजन केलं आहे. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणारे उमदेवार अर्ज दाखल करु शकतात. विद्यार्थ्यांनी बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एकूण १०५ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदासाठी आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र आणि इच्छूक उमदेवारांनी वेबसाईटवर अर्ज दाखल करावेत, असं सागंण्यात आलं आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास ४ मार्चपासून सुरुवात झाली असून २२ मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील. निवड झालेल्या उमदेवारांना बँक ऑफ इंडियाच्या भारतातील कोणत्याही शाखेत नोकरी करावी लागेल.
कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर
मॅनेजर डिजीटल फ्रॉड, क्रेडिट ऑफिसर,क्रेडिट इम्पोर्ट, फॉरेक्स संपादन आणि रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी पदनिहाय शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटवर भेट देऊन भरती प्रक्रिया आणि पात्रतेसंबंधी माहिती घ्यावी. अर्ज करणाऱ्या उमदेवारांकडे १ ते ३ वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्जाचं शुल्क
बँक ऑफ बडोदामधील स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांनी जाहिरात वाचून त्यानंतर अर्ज दाखल करावेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ४८ हजार रुपये ते ८९ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
मॅनेजर डिजिटल फ्रॉड पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कॉम्प्युटर सायन्स, आयटी किंवा डेटा सायन्स विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स,आयटी विषयात पदवी, बीएससी, बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण असावा. त्याच्याकडे ३ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. क्रेडिट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारानं पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे ८ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. याशिवाय सीए, सीएमए उत्तीर्ण असणारे आणि ७ वर्ष अनुभव असणारे उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. क्रेडिट ऑफिसर, क्रेडिट इम्पोर्ट- एक्सपोर्ट बिजनेस या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय अनुभव देखील असणं आवश्यक आहे. फॉरेक्स संपादन आणि रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आणि मार्केटिंग किवा सेल्स विषयात पदव्युत्तर पदवीसह पाच आणि तीन वर्षांचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.