
आपल्या प्रोडक्टचा खप वाढविण्यासाठी कंपन्या नवनवीन संकल्पना ग्राहकांसमोर आणत असतात. मात्र अशी नवी संकल्पना जागतिक स्थरावरील नेस्ले कंपनीला ( Nestle Company) चांगलीच अंगलट आली आहे. भारतात प्रसिध्द असलेल्या किटकॅट कंपनीचे चॉकलेटचे रॅपर नेस्ले कंपनीने आपल्या नव्या संकल्पनेनुसार तयार केले होते. रॅपवर उडीसा राज्यातील युनीक आर्ट पट्टचित्राचा वापर करण्यात आला. ज्यामध्ये ओडीसा राज्यातील देवांचे चित्र वापरण्यात आल्याने काही वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नेस्ले कंपनीने यावर जाहीर माफी मागून या संकल्पनेतून तयार केलेला सर्व माल परत घेण्याची ग्वाही दिली आहे.
Please remove the Lord Jagannath, Balabhadra and Mata Subhadra Photos In Your @kitkat Chocolate Cover . When People Are Finished The Chocolate They Are Through The Cover On Road, Drain, Dustbin, Etc . So Please Remove The Photos . @Nestle @NestleIndiaCare #Odisha pic.twitter.com/lczPnFpCTj
— Raimohan Parida (@RaimohanParida2) January 17, 2022
काय आहे मूळ प्रकरण?
नेस्ले कंपनीने स्थानिक पर्यटनस्थळांची सुंदरता साजरी करण्यासाठी एक कॅम्पेन सुरू केले होते. ज्यामध्ये मागील वर्षी कंपनीने ओडीसा राज्यातील परंपरेचे सादरीकरण करणारे चित्र तयार केले. या रॅपरवरील युनीक आर्टवर पट्टचित्राची झलक दाखवण्यात आली. या चित्रामध्ये ओडीसा राज्याच्या जगन्नाथ, बालभद्र, सुभद्रा देवी अशा देवांचे फोटो वापरण्यात आला. यावर काही ग्राहकांनी आक्षेप घेतला. चॉकलेट खाल्ल्यानंतर लोक रॅपर फेकून देतात किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकतात. यातून देवांच्या फोटोचा अवमान होत असल्याने ही चित्र हटवण्यात यावी अशी मगणी ट्विटरद्वारे होऊ लागली.
अखेर नेस्ले कंपनीने जाहीर केला माफिनामा
या चॉकलेट रॅपरवरील फोटो हा ओडीसा सरकारच्या पर्यटन वेवसाईटशी प्रेरित आहे. ओडीसा राज्यातील पट्टचित्र ही कला लोकांपर्यंत पोहचण्याचा कंपनीचा मूळ हेतू होता. याआधीच्या कंपनीने केलेल्या कॅम्पेनमध्ये ग्राहकांनी रॅपरवर केलेली सुंदर डिजाईन संग्रहीत करून ठेवण्यावर भर दिला होता. तरीही हा विषय अधिक संवेदनशील आहे याची आम्हाला जाणीव असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. नेस्ले कंपनीने पुढे सांगितले आहे की, अनावधानाने या संकल्पनेतून कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्यांची कंपनीने जाहीर माफी मागीतली आहे. तसेच सर्वांच्या भावनेचा विचार करून या काळात तयार केलेले सर्व प्रोडक्ट मार्केटमधून परत मागण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, असे कंपनीने जाहीर केले आहे.