Home ताज्या बातम्या विना मास्कच्या दंडातून मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची भर

विना मास्कच्या दंडातून मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची भर

385
0
मुंबई महानगरपालिकेने विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईत तब्बल ४० कोटी रुपये गोळा केले.

देशात कोरोनाचा उद्रेक वाढू नये यासाठी अनेक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच देशाच्या आर्थिक राजधानीतही लोकांसाठी बृह्नमुंबई महानगरपालिकेने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एप्रिल २०२० ते २१ मार्च २०२१ पर्यंत या कारवाईद्वारे २० लाख लोकांकडून तब्बल ४० कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे.

महाराष्ट्र राज्य हे देशात कोरोना रूग्णसंख्येत पहिल्या क्रमांकावर आहे. तरीदेखील लोकांना या परिस्थितीची जाणीव नाही हेच या घटनेतून स्पष्ट होते. केंद्र व राज्य सरकार कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करत असताना जनतेकडून असा निष्काळजीपणा होतोय हे दिसतयं. महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसाला ३० हजाराहून अधिक वाढ होत आहे. यातून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे चिन्ह जाणवू लागली आहेत. तरीही लोकांना याचे गांभीर्य नाही ही चिंताजनक गोष्ट समोर आली आहे.

Previous articleपॉर्न पाहण्याच्या सवयीतून १२ वर्षीय मुलाने बहिणीसोबतच केलं गैरकृत्य
Next articleकोरोना होऊन गेला असेल तर कोरोना लस घ्यायला हवी का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here