Home ताज्या बातम्या सावधान! बूस्टर डोसच्या नावाखाली होतेय फसवणूक.

सावधान! बूस्टर डोसच्या नावाखाली होतेय फसवणूक.

158
0

सध्या एक ध्वनीफित समाजमाध्यमातून फारच वायरल होत आहे. ज्याद्वारे मुंबईत एका नव्या टेलिफोन स्कॅमची सुरुवात झाली असल्याचे सांगितले जात आहे. सामान्य नागरिकांना कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन वेरियंट ची भीती दाखवून तिसऱ्या म्हणजेच बूस्टर डोस साठी नोंदणी करणार असल्याचे या कॉलद्वारे सांगितले जात आहे. मात्र नागरिकांनी या गंडतराला अजिबात भुलू नये कारण या कॉलद्वारे सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारला जात आहे. नेमकं काय आहे या ऑडियोमध्ये तुम्हीच ऐका…

 

तुमचा पटकन विश्वास बसावा म्हणून तुम्ही या आधी घेतलल्या दोन्ही डोसच्या वेळा आणि ठिकाण यामध्ये तुम्हाला सांगितले जातील. दुर्देवाने जर तुम्ही तिसरा डोस मिळावा म्हणून समोरील व्यक्तीस होकार दिलात तर भल्यामोठया आर्थिक संकटासाठी तयार रहा. त्या कॉलद्वारे तुमच्या आधी कोविन वेबसाईटचा ओटीपी आणि त्यानंतर तुमच्या बॅक खात्याचा अकाऊंट नंबर व ओटीपी मागण्यात येईल. जर तुम्ही हि सारी माहिती समोरील व्यक्तीस पुरवली तर तुमच्या खात्यातून भलीमोठी रक्कम काढली जाऊ शकते.

प्रामुख्याने या घोटाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केले जात आहे. आपण जर या आधीही पाहिले असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या वेळेस सर्वात आधी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले गेले होते. त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिक व त्यानंतर १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरु केले गेले होते. अगदी त्याच पद्धतीने लोकांना संशय येऊ नये म्हणून या घोटाळेबाजांकडून सर्वात आधी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केले जात आहेत.

सायबर सेलकडील माहितीनुसार याआधीच या घोटाळ्यामध्ये बऱ्याच सामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचेही या ऑडियोमध्ये नमूद करण्यात आलयं.

भारत सरकारद्वारे अजूनही तिसऱ्या अथवा बूस्टर डोसची कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही. त्यामुळे फ्रॉड कॉल्सना अजिबात भुलू नका.

वेळीच सावध व्हा…

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज आणि कर्नाटक कनेक्शन तुम्हाला माहीत आहे?
Next articleनवी मुंबई पोलीस दलात नोकरीची सुवर्ण संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here