मुंबईत कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत आहे. मास्क घालणे बंधनकारक आहे. आता पुन्हा एकदा क्लीनअप मार्शल ठिकठिकाणी उभे राहिलेले दिसतील. मुंबई महानगरपालिकेने क्लीनअप मार्शलसाठी नवी नियमवाली जाहीर केली. क्लीनअप मार्शलकडे महापालिकेच्या विभागातून किंवा वॉर्डातून मिळालेले ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणे सक्तीचे आहे. दंड भरताना प्रत्येक नागरिकांनी क्लीनअप मार्शलचे ओळखपत्र तपासून दंड भरावा.
मागच्या काळात क्लीनअप मार्शलद्वारे फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. दंड वसूल करताना क्लीनअप मार्शल शाब्दीक व मारामारीचे प्रकार सोशल मीडियावरून प्रसारित झाले आहे. त्यामुळे क्लीनअप मार्शलच्या तक्रारीसाठी १८००२२१९१६ टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.
महापालिकेच्या नियमानुसार सर्व क्लीन-अप मार्शलने गणवेशात असायला हवे आणि ज्यांना ते दंड भरण्यास सांगतील त्यांना आपले ओळखपत्र दाखवावे. प्रभागाचे नाव, अनुक्रमांक आणि दंडाची रक्कम लिहिलेली पावती मार्शलने देणे बंधनकारक आहे.
बऱ्याचदा क्लीनअप मार्शल गणवेश न घालता असायचे. तसेच ते दंडाची पावती लोकांना द्यायचे नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा नवीन नियम मुंबई महापालिकेने केला आहे. नव्या नियमानुसार विना मास्कधारकांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.