Home ताज्या बातम्या आपल्या मुलांच्या कोविड लसीकरणासाठी असा करा स्लॉट बुक! COVID-19

आपल्या मुलांच्या कोविड लसीकरणासाठी असा करा स्लॉट बुक! COVID-19

275
0
Child Vaccination

देशभरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना आता कोविड १९ प्रतिबंधक लस घेता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार मुलांना भारत बायोटेकचं कोवॅक्सीन आणि झायडस कॅडिलाची लस मिळणार आहे. सध्यस्थितीला लसीकरणासाठी केवळ कोवॅक्सीन उपलब्ध आहे. लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली असून आजपासून लसीकरणाला सुरूवात झाली. प्रौढांच्या लसीकरणाप्रमाणेच मुलांसाठी आरोग्य सेतू (Aarogya Setu) आणि उमंग अ‍ॅपशी संलग्न असलेल्या कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल.

मुले स्वतः ऑनलाईन नोंदणी करू शकतात किंवा त्यांचे पालकही आधीच नोंदणीकृत असल्याने पाल्यांना लाभार्थी म्हणून त्यांची नोंदणी करू शकतात. तसंच मुले आधारकार्डशिवाय त्यांच्या विद्यार्थी ओळखपत्राचा वापर करूनही नोंदणी करू शकतात. तुम्ही कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी (COVID-19 vaccine) आरोग्य सेतू अ‍ॅपवर खालील पद्धतीने नोंदणी करू शकता.

१) सर्वप्रथम अ‍ॅप उघडा आणि त्यावर उजव्या बाजूला असलेला कोविन (CoWIN) पर्याय निवडा.

२) लसीसाठी नोंदणी किंवा लॉगइन (Login / Registration) पर्याय निवडा आणि मोबाइल क्रमांकाने लॉग-इन करा.

३) तुम्ही जर नवीन युजर असाल, तरीही तुम्ही स्लॉट बुक करू शकता किंवा लाभार्थी म्हणून स्वतःला नोंदवू शकता.

४) तुमची माहिती त्यात भरा. फोटो आयडीसाठी (Photo ID) विद्यार्थी शाळेचे ओळखपत्रही वापरू शकतात, फोटो आयडी नंबर आणि फोटो आयडीवरील नावाप्रमाणे लाभार्थी म्हणून नोंदवू शकता.

५) त्यानंतर लिंग आणि जन्म वर्ष याबाबत माहिती भरा.

६) एकदा ही माहिती भरल्यानंतर तुम्ही पुन्हा लाभार्थी पर्याय असलेल्या पेजवर पोहोचाल. तेथील नव्या लाभार्थीच्या नावाच्या बाजूला असलेलं कॅलेंडरचं चिन्ह निवडा.

७) तिथे तुमचा पिनकोड आणि तारीख टाका. युजर मोफत किंवा पैसे भरून या पर्यायानुसार लसीकरणासाठी केंद्र निवडू शकतात.

८) एकदा केंद्र निवडल्यावर तुम्हाला त्यानुसार अ‍ॅपवर उपलब्धता आणि तारीख दिसेल.

९) एकदा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की प्राप्त लसीकरण केंद्रावर दिलेल्या वेळेवर जाऊन आपले लसीकरण करून घ्या.

Previous articleनवी मुंबई पोलीस दलात नोकरीची सुवर्ण संधी
Next articleनवाब मलिकांमुळे समीर वानखेडेंचा करेक्ट कार्यक्रम; NCBचा कार्यकाळ संपला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here