मुस्लिम महिलांची बदनामी करणारे ‘बुल्ली बाई’ ॲप प्रकरण ताजे असताना आता ‘क्लब हाऊस’ या ऑडिओ बेस्ड सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर मुस्लिम महिलांबाबत अत्यंत निंदनीय, बदनामीकारक भाषेत चर्चा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकतीच क्लब हाऊसवरील मुस्लिम महिलांवर होणाऱ्या चर्चेचे स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे.
Trigger Warning ⚠️
Here in @Clubhouse, a young group of Hindus are discussing with impunity: a) "hitting on a muslim girl's vagina is equal to destruction of 7 Babri masjids", b) "we're RSS fans, we'll convert muslim girls, & c) muslim girls' vagina is pinkish than hindus
1/2 pic.twitter.com/X3MSJrFlNv— Jaimine (@jaiminism) January 17, 2022
बुल्ली बाई ॲपवर मुस्लिम महिलांना टार्गेट करून त्यांच्यावर बोली लावण्याचा प्रकार सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून यातील आरोपींना अटक केली. या प्रकरणात आरोपींची एक विकृत मानसिकता दिसून आली. अशी विकृत मानसिकता क्लब हाऊसवर चर्चा करणाऱ्या लोकांमध्ये दिसून येते. अलीकडे जाणूनबुजून मुस्लिम महिलांना टार्गेट केले जाते का? असा प्रश्न उपस्थित होतो.
व्हायरल झालेल्या स्क्रीन रेकॉर्डिंग मुस्लिम महिलांना हिंदुमध्ये कसे कन्व्हर्ट करता येईल, त्यांच्या सौदर्याबाबत अतिशय निंदनीय भाषेत चर्चा केली जात आहे. यातून मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात येत आहे. या व्हायरल स्क्रीन रेकॉर्डिंगवर सोशल मीडियावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी अशा विकृत मानसिकतेचा निषेध व्यक्त केला आहे. बुल्ली बाईप्रमाणे क्लब हाऊससुद्धा मुस्लिम महिलांची बदनामी करण्यासाठी वापर करण्यात येत आहे का ?, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
काय आहे क्लबहाऊस ॲप
क्लबहाऊस ॲप हे ऑडिओ बेसेस चॅट ॲप आहे. येथे तुम्हाला एखाद्या विषयावर चर्चा करायाची असल्यास चॅट रूम तयार करून त्यात वॉईस चॅट करता येते.