Home ताज्या बातम्या ‘कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक. लहान मुले, तरुण-तरुणी, गर्भवती महिलांना अधिक...

‘कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक. लहान मुले, तरुण-तरुणी, गर्भवती महिलांना अधिक धोका’ तज्ज्ञांचा इशारा

321
0
corona virus
दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही आधीपेक्षा जास्त धोकादायक आहे. हे रोज समोर येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरुन कळते. दिल्लीतील लोकनायक रुग्णालयाचे एम.डी. डॉ. सुरेश कुमार याच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित होणाऱ्यांमध्ये सर्वांत जास्त संख्या तरुण, लहान मुले आणि गर्भवती महिलांमध्ये जास्त दिसून येऊ शकते.

डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले की कोरोनाची दुसरी लाट ही अधिक वेगाने पसरत आहे. दिल्लीत मागील आठवड्यात २० रुग्ण होते ते आता ती संख्या आता १७० वर गेली आहे. महाराष्ट्रप्रमाणे दिल्लीत देखील बेड्सची कमतरता आहे.

डॉ. सुरेश कुमार म्हणाले की, आधी कोरोनाचे रुग्ण हे मध्यम वयोगटातील लोकांना होत होता. परंतू आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये तरुण, लहान मुले आणि गर्भवती महिलांचा अधिक समावेश आहे. जी खूपच चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या या लाटेला सामोरे जाण्यासाठी आम्ही रुग्णालयात बरीच व्यवस्था केली आहे.

लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांबाबत तज्ज्ञ काय म्हणाले?

विशेष म्हणजे मुंबईत दुसर्‍या लाटेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये लक्षणेच दिसून येत नाहियेत. हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडिया आणि कंफडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशन ऑफ एशियाचे अध्यक्ष डॉ. के.के अग्रवाल यांच्या मते, महिला आणि मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी असतात, परंतु त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आली याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीच्या शरीराला कोरोना होऊ शकतो. याचा उपाय असा आहे की जर आपण कोणत्याही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आला असाल तर स्वत:ला क्लारंटाईन करुन घ्यावे.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

दिल्लीमध्ये गेल्या काही काळात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. दिल्लीत चोवीस तासांत कोरोनाचे एकूण ५१०० रुग्ण आढळले आहेत. हा आकडा नोव्हेंबर २०२० नंतरचा सर्वांत जास्त आकडा आहे. यामुळे दिल्लीत देखील रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत दररोज ३ हजारपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. पंरतू कालच्या माहितीप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांच्यावर गेली आहे. मंगळवारी दिल्लीत एक लाखाहून अधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या.

दिल्लीबरोबरच महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील कालची कोरोना रुग्ण संख्या ५६ हजारांवर गेली. महाराष्ट्र आणि दिल्लीप्रमाणे यूपी, कर्नाटक, पंजाब येथे ही रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

जर आपण संपूर्ण देशाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, काल देशभरात कोरोनाचे १.१५ लाख रुग्णांची नोंद झाली. या आकड्याने गेल्या वर्षभरातील सर्वांत जास्त रुग्णसंख्या आहे. देशात सध्या ८.४१ लाख कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. होळीपासूनच कोरोना रुग्णांची देशात वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसांत देशात तीन लाखाहून अधिक नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Previous articleफोर्ब्स यादीतील टॉप १० भारतीय श्रीमंत व्यक्ती; अंबानी-अदानीसोबत पुनावालांचा समावेश
Next articleकोरोना लसीचे वेस्टेज कसं होतं? हे वेस्टेज कसं रोखता येईल?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here