Home ताज्या बातम्या दिलासादायक! मुंबईत कोरोनाची आकडेवारी घटली!!

दिलासादायक! मुंबईत कोरोनाची आकडेवारी घटली!!

345
0

 

नववर्षाची सुरुवात होताच महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची आकडेवारी वाढत होती. त्यातच ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचेही रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळून येत होते. नववर्षाच्या सुरुवातीच्या सात दिवसात एकट्या मुंबईमध्येच कोरोनाचे रुग्णांमध्ये दिवसेगणिक दुप्पटीने वाढले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील जर कोरोना रूग्णाची आकडेवारी प्रतिदिन २०,००० च्या पुढे गेली तर मुंबईत लॉकडाऊन लागू शकतो, असे संकेत दिले होते. दिनांक ०७ जानेवारी २०२२ रोजी मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी एकूण २० हजार ९७१ इतकी होती. त्यावेळेस मुंबईत जरी लॉकडाऊन लागला नसला तरी राज्य सरकारतर्फे संपूर्ण राज्यात सौम्य निर्बंध लादले गेले. सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी व रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदीचे नियम संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आले.

मुंबईकरांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे ७ जानेवारी रोजी २० हजाराच्या पलीकडे असलेली कोरोना रूग्णांची आकडेवारी हि आता १० हजाराच्या घरात आली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबईतील प्रतिदिन कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये कशाप्रकारे घट झाली यावर एक नजर टाकूयात.

०७ जानेवारी २०२२ – एकूण रूग्ण २० हजार ९७१

०८ जानेवारी २०२२ – एकूण रूग्ण २० हजार ३१८

०९ जानेवारी २०२२ – एकूण रूग्ण १९ हजार ४७४

१० जानेवारी २०२२ – एकूण रूग्ण १३ हजार ६४८

११ जानेवारी २०२२ – एकूण रूग्ण ११ हजार ६४७

काल दिवसभरात ११ हजार ६४७ रूग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ८५१ जणांना रूग्णालयात दाखल करावे लागले तर ७६ जणांना ऑक्सिजनची गरज लागली. २२ डिसेंबर पासून सुरू झालेल्या चाचण्यांच्या प्रमाणात बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्क्यांवरून गेल्या दोन दिवसांत २० टक्क्यांवर आले आहे.

मेडिकल दुकानदारांना सेल्फ किट विक्रीचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक

सध्या बाजारात कोरोना चाचणी करण्यासाठी सेल्फ किट सुद्धा विक्रीस उपलब्ध झाले आहेत. कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली घट ही सकारात्मक असली तरी घरच्या घरी सेल्फ किटद्वारे चाचणी करणारे नागरिक आपला अहवाल हा बहुतांशी प्रशासनापर्यंत पोहोचवत नाही. त्यामुळे रूग्णांच्या आकडेवारी विसंगती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिका मेडिकल स्टोअर्सच्या द्वारे होत असलेल्या सेल्फ किटच्या विक्रीवर लक्ष ठेवणार आहे. किट विकल्यानंतर संबंधिताचा संपर्क क्रमांक आणि पत्ता याची नोंद ठेवणे मेडिकल विक्रेत्यांना बंधनकारक असेल.

रूग्णसंख्या घटत असली तरी खबरदारी घ्या

मुंबईतल्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी घट होत असली तरी कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनातर्फे जाहिर केलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे व स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, कामानिमित्त घराबाहेर पडताना मास्क योग्यरित्या परिधान करावा, सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा.

Previous articleTrads Group : सुल्ली डिल्स, बुल्ली बाई ॲपच्या मागे आहे हिंदुत्त्ववादी मानसिकता
Next article‘लोकशाहीसाठी हे धोकायदायक’ १२ आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here