Home ताज्या बातम्या coronavirus news-आशादायक-बातमी; झायडस कॅडिलाच्या औषधाला डीसीजीआयची परवानगी

coronavirus news-आशादायक-बातमी; झायडस कॅडिलाच्या औषधाला डीसीजीआयची परवानगी

198
0

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वेगाने वाढत आहे. काल तर देशात पहिल्यांदाच ३ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये आता कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. तसेच कोरोना लसीकरणाचं कामही देशात फार प्रगतीपथावर होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आता झायडस कॅडिलानं तयार केलेल्या कोरोनावरील औषधाच्या वापरास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीसीजीआय) परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच झायडस कॅडिला कंपनीने तयार केलेल्या ‘विराफिन’ औषधाचा वापर सुरू होईल. सध्याच्या घडीला देशात कोवॅक्सिन, कोविशील्ड लसींचा वापर सुरू आहे. तर पुढील काही दिवसांत स्पुटनिकची लस देखील भारतात उपलब्ध होणार आहे.

विराफिनचा वापर कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये करता येईल. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर विराफिनच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून हाती आलेले निष्कर्ष सकारात्मक आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारात विराफिनचा वापर केल्यास अवघ्या ७ दिवसांत ९१.१५ टक्के रुग्णांचे आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा झायडस कॅडिलाने केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यात आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगानं खाली पाडण्यात विराफिन फार उपयोगी ठरेल. कोरोना रुग्णांना सुरुवातीच्या कालावधीत विराफिन दिलं गेल्यास रुग्ण अधिक लवकर बरा होतो. त्याला होणारा त्रासदेखील कमी होतो, असा झायडस कॅडिला कंपनीचा दावा आहे. हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं देण्यात येईल. ते सुरुवातीला केवळ रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल.

देशात सध्याच्या घडीला २४ लाख २८ हजार ६१६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल आणि परवा देशात ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं देशातील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण पडत आहे. अनेक रुग्णालयांची रूग्णक्षय्यांची क्षमताही संपली आहे. अशा परिस्थितीत रुग्ण लवकर बरे झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकतो. त्या दृष्टीनं झायडसच्या या विराफिन औषधाला मिळालेली परवानगी फार महत्त्वाची आहे.

Previous articleरिअर हिरो! मयुर शेळके बक्षिसातील अर्धी रक्कम देणार अंध मातेला
Next articleतर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दाखल्यावरही मोदींचा फोटो लावा; पंजाबच्या वृद्धाची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here