Home ताज्या बातम्या पूरानंतर आता सरीसृपांची, मगरीची दहशत

पूरानंतर आता सरीसृपांची, मगरीची दहशत

440
0
राज्यात मागील आठवड्यात आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच आता पूराचे पाणी ओसरल्यानंतर लोकांमध्ये सरीसृप, मगरीची भीती वाढली आहे. सांगली भागात कृष्णा नदीखोऱ्यातील मगरी नागरी वस्त्यांमध्ये आल्यामुळे लोक चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत नेमकं काय कारावे याचा रितसर माहीती जाणून घ्या.

काही दिवसांपूर्वी राज्यात आलेल्या महापूरात लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील पूराचे थैमान आता ओसरू लागले आहे. पूरग्रस्तांना पुढे उभ्या असलेल्या संकटाची चाहूल
पाणी ओसरू लागल्यावर जाणवू लागली आहे. पाणी कमी होत असताना साप, मगर, इतर प्राणी घरात अथवा घराच्या आवारात आढळून येत आहेत. सांगली भागात अनेक ठिकणी मगरींचे दर्शन देखील झाले आहे. या मगरी पूराच्या पाण्यात वाहून आल्या
असल्याचे पाणी कमी झाल्यानंतर निदर्शास आले. मगरीची भीती लोकांमध्ये असल्याने मगर अचानक समोर आल्यावर परिस्थिती कशी हाताळावी यात लोक चक्रावून जातात.

आधी पाहुया मगरीचे प्रकार

भारत देशात अनेक सरपटणारे प्राणी आढळतात. यामध्ये मगरीचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. एक क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस ही गोड्या पाण्यात राहणारी मगर आहे. दुसरी म्हणजे क्रोकोडीलस पोरोसस ही खाऱ्या पाण्यात राहणारी असून खाड्यांत व समुद्र किनाऱ्यावर आढळते. गोड्या पाण्यात आढळणारा मगर सरासरी लांबी ४.५ मी. असते. मात्र खाडीत राहणारा मगर कधीकधी ६ मी. पेक्षाही जास्त लांब असतो.

वरील प्रकारातील क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस जातीचा मगर हा सांगली जिल्ह्यात कृष्णेच्या खोऱ्यात आढळतो. वन्य अभ्यासकांच्या मते या मगरीचा माणसाला सहसा धोका उद्भवत नाही. अनेकदा या मगरी ऊन घेण्यासाठी जमिनीवर बसलेल्या दिसतात.
यावेळी माणसाची चाहूल लागल्यास या पाण्यात उडी घेत पळ काढतात. सध्या सांगली भागात आपल्याला काहीसा हा प्रकार पहायला मिळतो आहे. लोकांच्या वास्तव्याच्या ठिकाणी, पाणी साचलेल्या ठिकाणी, रस्त्यावर मगरी दिसून आल्याने लोक
तणावाखाली आहेत.

 

 

आपल्या भागात मगर, साप तत्सम वन्यप्राणी आढळल्यास काय खबरदारी घ्यावी?

भारतीय वन्यजीव अधिनियम कायदा १९७२ नुसार आपण कोणत्याही वन्यप्राण्याला हाताळू शकत नाही. यासाठी आपण १९२६ या क्रमांकावर फोन करून वन्यजीवाची माहिती त्वरीत द्यावी. अन्यथा वन विभागाशी संपर्क साधावा. यापैकी आपल्याला
पर्याय उपलब्ध नसल्यास अधिकृत प्राणी संवर्धन संस्थेच्या स्थानिक सर्पमित्र, प्राणीमित्र यांना घटनास्थळी बोलवावे. यादरम्यान समोर असलेल्या प्राण्यावर सुरक्षित अतंर ठेवून त्याला न डिवचता पाळत ठेवावी. या सोप्या पद्धतीने अनेक जीवघेण्या
अपघाताचे चिन्ह उद्भवत नाही. तसेच प्राण्याला सुखरुपरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.

Previous articleपूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ७०० कोटींच्या मदतीमागचे सत्य
Next articleखडतर मेहनतीच्या जोरावर २५ व्या वर्षी IPS; वैभव निंबाळकर यांचा प्रेरणादायी प्रवास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here