Home ताज्या बातम्या कोकणाला मगरी ठरल्या वरदान, रत्नागिरीत ‘क्रोकोडाईल सफारीतून’ रोजगारनिमिर्ती

कोकणाला मगरी ठरल्या वरदान, रत्नागिरीत ‘क्रोकोडाईल सफारीतून’ रोजगारनिमिर्ती

254
0
महाराष्ट्र सरकार आणि Mangrove Cell यांच्या माध्यमातून कोकणवासियांना मिळाला रोजगार

निसर्ग सौदर्याने नटलेल्या महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी ही परदेशी पर्यकटकांचेही आकर्षण ठरत आहे. कोकणात पर्यटनासाठी राज्यातून तसेच देशातूनही लोक येत असतात. यालाच आता इकोटूरीझमचे वलय मिळत आहे. कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सोनगाव अशाच इकोटूरिझम पर्यटनामुळे स्थानिकांच्या हाती हजारो रुपयांचा रोजगार मिळू लागला आहे. महाराष्ट्र सरकार आणि Mangrove Cell यांच्या माध्यमातून वशिष्ठी नदीच्या किनारपट्टीवर ३ मेपासून क्रोकोडाईल सफारी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ज्यामध्ये स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. या भागाचा विकास होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय.

सोनगाव इकोटूरिझमच्या माध्यमातून खारफुटी आणि जैवविविधता संवर्धनासाठी व स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ज्यामध्ये सहा महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर सोनगाव गावातील ३० गावकरी पर्यटकांना खारफुटीच्या पायवाटेवर घेऊन जातात. ज्यामध्ये पर्यटकांना बोटीतून किनारपट्टीच्या परिसरात फरवून त्यांना मगरींचे दर्शन घडविले जाते. मगर हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची क्रमांक एकमध्ये झाला आहे. मगर या प्रजात धोक्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या उपक्रमामुळे मगर या प्राण्याच्या संवर्धनाला अधिक बळकटी मिळेल. यासोबतच सोनगावच्या किनारपट्टीवर इतर वन्यप्राणी, पक्षी, झाडे याची माहीतीदेखील पर्यटकांना या सफारीदरम्यान दिली जाते.

वाशिष्ठी नदीत घोडेखोर किंवा दलदलीच्या मगरीची अधिकृत गणना नसताना, स्थानिकांनी वाशिष्ठी नदीच्या बॅकवॉटरमध्ये एका बोटीत सुमारे २० जणांना पाहिले होते. दरम्यान २०१९ ते २०२१ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात, Ela Foundation या NGO ला आणि वाशिष्ठी नद्यांमध्ये १०७ मगरी आढळल्या अशी माहिती समोर आली आहे. या उपक्रमाबद्दल स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मगर सफारी केली जाते. नदीच्या स्थितीवर मगरींचे प्रमाण दिसून येते. नदीला भरती कमी असल्यावर मगरी मोठ्या प्रमाणात दिसतात. सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची संख्या जास्त असल्यास दिवसाला १० ते १५ हजार रुपयांची कमाई होते, तसेच पर्यटकांना राहण्याची सुविधासुद्धा पुरविण्यात येत आहे असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

Previous articleसंदीप देशपांडे यांच्या अटकेवरुन राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र
Next article“पॉलिटिकल बायोपिक” मधून पॉलिटिकल अजेंडा रेटण्यासाठी सिनेमास्त्राचा वापर होतोय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here